Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

शेतकरी स्वातंत्र्याचा संकल्प बळकट करण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने अन्नत्याग आंदोलन

पुणे : १९ मार्च १९८६  रोजी या देशातील पहिली शेतकरी आत्महत्या झाली ज्याची शासन दरबारी अधिकृत नोंद आहे ती म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण या गावातील सामाजिक व संत विचारांचे शेतकरी स्मृतीशेष साहेबराव पाटील करपे यांनी त्या दिवशी आपली पत्नी व चार मुलांसहित वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर कुष्ठधामात सामुहिक आत्महत्या केली.

शासनाची शेतकरीविरोधी धोरणे व त्यातून शेतीव्यवसायात झालेली विदारक अवस्था हेच त्या सामुहिक मरणकांडामागील मुख्य कारण होते.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता.तेव्हापासून आजतागायत शेतकरी आत्महत्यांची मालिका देशभरात सुरुच आहे.४ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मागील काही वर्षात चुकीच्या सरकारी धोरणामुळे आपले आयुष्य संपविले आहे. शेतीसोबत निगडीत असलेल्या सर्वांप्रती संवेदना व्यक्त करणे हे प्रत्येक संवेदनशील व विचारी माणसाचे कर्तव्य आहे.त्यामुळे आत्महत्या केलेल्या समस्त शेतकरी बांधवांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी,शेतकरी आत्महत्यांना कारणीभूत ठरलेल्या कमाल शेतजमीन धारणा (सिलिंग),आवश्यक वस्तू,जमीन अधिग्रहण आदी नरभक्षक कायद्यांचा विरोध करण्यासाठी व शेतकरी स्वातंत्र्याचा संकल्प बळकट करण्यासाठी संभाजी ब्रिगेड पुणे जिह्याच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात आले,

यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, जिल्हा सचिव निलेश ढगे, मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष जयदीप रणदिवे, व्यापारी आघाडी कार्याध्यक्ष विवेक कावरे,जिल्हा संघटक हनुमंत गुरव, शिरूर लोकसभा कार्याध्यक्ष गणेश बावणे, कामगार आघाडी संघटक अंकुश हाके, संघटक संतोष सुर्यवंशी, एकनाथ पवार,उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading