प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे याच्या विरोधात केली पोलिसांत तक्रार दाखल

पुणे:. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेनड्राईव्ह बॉम्ब टाकला होता. त्यानंतर राज्यात खळबळ माजली होती. फडणवीसांच्या गंभीर आरोपांनंतर विशेष सरकारी वकि चव्हाण राजीनामा घेण्यात आला होता, कारण फडणवीसांनी दिलेल्या पेनड्राईव्ह मध्ये प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयातील स्टिंग ऑपरेशन होते. त्यानंतर आपल्याला स्वतःला या प्रकरणातून बाहेर व्हायचं आहे असं म्हणत विशेष सरकारी वकिल असलेले प्रवीण चव्हाण यांनी राजीनामा दिला. आता त्यांनी तेजस मोरे याच्या विरुद्ध पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

प्रवीण चव्हाण यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात  तेजस मोरे याच्या विरोधात काल रात्री तक्रार दाखल केली असून या तक्रारीत आपल्या गोपनीयतेचा भंग, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्याचा आरोप प्रवीण चव्हाण यांनी केलाय. प्रवीण चव्हाण यांच्या ऑफिसमध्ये केलेलं स्टिंग ऑपरेशन हे तेजस मोरे यांनी केल्याचा आरोप चव्हाणांनी केला होता. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सादर केलेल्या पेनड्राईव्ह बॉम्बनंतर या संपूर्ण नाट्याला सुरुवात झाली.

Leave a Reply

%d bloggers like this: