नवी टीव्हीएस ज्युपिटर झेडएक्स SMARTXONNECT आणि व्हॉइस असिस्ट वैशिष्ट्यांचा समावेश

पुणे : दुचाकी आणि तीनचाकी गाड्यांची जगातील नामवंत उत्पादक टीव्हीएस मोटर कंपनीने नवी टीव्हीएस ज्युपिटर झेडएक्स दाखल केली जी SMARTXONNECTTM ने सुसज्ज आहे.  ‘ज्यादा का फायदा’ मिळवून देण्यासाठी नेहमीच वचनबद्ध असलेली टीव्हीएस ज्युपिटर ही देशातील ग्राहकांची एक सर्वाधिक पसंतीची स्कूटर आहे.

ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी हे वैशिष्ट्य ११० सीसी स्कूटरमध्ये टीव्हीएस ज्युपिटर ग्रँड एडिशनसोबत आणले गेले.  आता SMARTXONNECTTM हे वैशिष्ट्य नवीन स्कूटरच्या टॉप लाईन प्रकारामध्ये सादर केले जात असून त्यासोबत संपूर्णपणे डिजिटल कन्सोल, व्हॉइस असिस्ट, नेव्हिगेशन असिस्ट, एसएमएस/कॉल अलर्ट अशी श्रेणीतील सर्वोत्तम तंत्रज्ञान वैशिष्ट्ये देखील सादर करून टीव्हीएस मोटरने आजच्या काळातील तंत्रज्ञानप्रेमी ग्राहकांची आवडनिवड आणि गरजा पूर्ण केल्या आहेत. ज्यादा अर्थात अधिक जास्त सुविधा देण्यावर सर्वाधिक भर देण्याच्या आपल्या धोरणाला अनुसरून व्हॉइस असिस्ट वैशिष्ट्य असलेली ही ११० सीसीची पहिली स्कूटर आहे.  टीव्हीएस SMARTXONNECTTM प्लॅटफॉर्म हे नाविन्यपूर्ण ब्ल्यूटूथमार्फत चालणारे तंत्रज्ञान असून ते खास टीव्हीएस कनेक्ट मोबाईल ऍपसोबत जोडले गेले आहे. हे ऍप अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर वापरता येते.

व्हॉइस असिस्ट या संवादात्मक वैशिष्ट्यामुळे ग्राहकांना टीव्हीएस SMARTXONNECTTM ऍप्लिकेशनला ब्ल्यूटूथ हेडफोन्स, वायर्ड हेडफोन्स किंवा कनेक्टेड किंवा ब्ल्यूटूथ असलेले हेल्मेट यासारख्या कनेक्टेड डिव्हाईसमार्फत दिलेल्या व्हॉइस कमांड्समार्फत स्कूटरसोबत संवाद साधता येतो. स्कूटरने दिलेला प्रतिसाद स्पीडोमीटरवर दिसतो किंवा हेडफोन्समधून ऑडिओमार्फत ऐकू येतो.

या स्कूटरमध्ये आता सिल्वर ओक इनर पॅनेल्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे सर्वात प्रमुख प्रकार हा इतर मॉडेल्सपेक्षा वेगळा व उठून दिसतो, आकर्षक ठरतो. या आधुनिक वैशिष्ट्यांबरोबरीनेच टीव्हीएस ज्युपिटर झेडएक्समध्ये ज्यादा म्हणजेच अधिक जास्त स्टाईलसाठी नवीन ड्युएल टोन सीट दिली गेली आहे, त्याची डिझाईन पॅटर्न देखील नवीन आहे. टीव्हीएस ज्युपिटर सीरिजमधील या प्रकारात मागच्या सीटसाठी बॅकरेस्ट देखील दिले गेले आहे, त्यामुळे प्रवाशांना अधिक जास्त सुविधा व आरामासह प्रवास करता येतो.

टीव्हीएस ज्युपिटर झेडएक्स SMARTXONNECTTM ही इंटेलिगो तंत्रज्ञान व आय-टचस्टार्ट यांनी सुसज्ज आहे.  यामध्ये इंटीग्रेटेड स्टार्टर जनरेटर यंत्रणा एकीकृत करण्यात आली असून, एलईडी हेडलॅम्प्स, २ लिटर ग्लोव्हबॉक्स मोबाईल चार्जर, २१ लिटर स्टोरेज आणि फ्रंट डिस्क ब्रेक ही आकर्षक वैशिष्ट्ये देखील आहेत.  टीव्हीएस ज्युपिटरचे ११० सीसी इंजिन ७५०० आरपीएमला कमाल ५.८ किलोवॅट पॉवर प्रदान करते व ५५०० आरपीएमला सर्वाधिक टॉर्क आउटपुट ८.८ एनएम देते.

टीव्हीएस ज्युपिटर झेडएक्स SMARTXONNECTTM ची किंमत ८०,९७३ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) असून मॅट ब्लॅक व कॉपर ब्राऊन हे दोन नवीन रंग यामध्ये आता उपलब्ध आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: