आलिया भट्टच्या वाढदिवासा दिवशी चाहत्यांना मिळाली अनोखी भेट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा आज 29वा वाढदिवस आहे. या वाढदिवासाचा आनंद द्विगुक करत आलिया भट्टने आपल्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज करीत चाहत्यांना अनोखी भेट दिली आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट सोबत रणबीर कपूर, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मौनी रॉय आणि नागार्जुन हे या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. 9 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीने देखील इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करून या चित्रपटातील आलियाचा लूक रिलीज केला आहे. हा व्हिडीओ शेअर करीत त्याने आलिया भट्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: