रघुनाथ कुचीक प्रकरणातील पिडीत मुलगी गायब – चित्रा वाघ

पुणे : पुण्यात शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले आहेत. त्या प्रकरणात त्यांना जामीनही मंजूर झाला आहे. संबंधीत मुलीने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. संबंधीत मुलगी तिच्या वडीलांसोबत नसून ती गायब आहे, अशी धक्कादायक माहिती भाजप नेत्या चित्रा वाघ आज पत्रकार परिषदेत दिली. आपल्याकडे अनेक हेल्पलाईन नंबर बनवण्यात आले आहेत. निर्भया पथक, दामिनी इतकं सगळं काढून ठेवलंय कशासाठी? असा सवालही चित्रा वाघ यांनी यावेळी विचारला.

या पत्रकार परिषदेला भाजपचे पुणे शहर प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर, नगरसेवक धनंजय जाधव उपस्थित होते.

पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, या पिडीत मुलीला 4 ठिकाणी गर्भपातासाठी नेण्यात आले होते. ज्या हॉस्पिटलमध्ये तिला नेण्यात आले होते त्या हॉस्पिटलची अद्याप चौकशी झालेली नाही. आज ती मुलगी गायब आहे. पीडित मुलीचे काल लोकेशन इस्लामपूर होते. आज पणजी दिसत आहे. मला मुलीच्या घातपाताची शक्यता वाटत आहे.

पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. बलात्काऱ्यांच्या पिलावळलीला वाचवण्यात पुणे पोलीस आयुक्त फार बिझी असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. मागच्या वेळी संजय राठोड आणि आता रघुनाथ कुचिक. पोलिसांनी जी शपथ घेतली त्या नुसार काम करायचं असतं असा टोला चित्रा वाघ यांनी पुणे पोलिसांना लगावला आहे.

पीडितेच्या उपचाराचे बील शासनाने द्यावे

काल वडगावशेरी येथे एक विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून तरुणाने धारदार हत्याराणे हल्ला केला. या हल्ल्या प्रकरणी चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. पीडितेच्या उपचाराचे रुबी हॉलचे बिल शासनाने नाहीतर शाळेने द्यावे. तसेच या शाळेची मान्यता चेक करा असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

शाळा, महाविद्यालयांमध्ये जात, धर्माला थारा नको 

कर्नाटक सरकारने आज मुस्लिम मुलींना फक्त शैक्षणिक ठिकाणी हिजाब घालायला परवानगी नाकारली आहे. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या,हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने जो नीकाल दिला आहे त्याचं स्वागत करतच चित्रा वाघ यांनी शाळा आणि महाविद्यालयाच्या आत मध्ये जात , धर्म, पंथ याला अजिबात थारा नको असं मत देखील भाजपा नेत्या चित्रा वाघ या म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: