Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

आज दिवसभरात पुणे शहरात नवीन 18 कोरोना रुग्णांची नोंद 

पुणे : एकीकडे चीनमध्ये पुन्हा काही शहरात लॉकडाऊन झाल्याची बातमी येत असतानाच दुसरीकडे पुणे शहरात कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याचे दिलासायक चित्र आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 18 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 137 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यात गेल्या 24 तासात एकाही रुग्णांच्या मृत्यूची नोंद नाही. पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 61 हजार 643 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 51 हजार 850 रुग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत पुणे शहरात 9348 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर पुणे शहरामध्ये सध्या 445अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 2 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2101 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading