बीएसएएमच्या अध्यक्षपदी राजन खिंवसरा यांची फेरनिवड

पुणे : बिलियर्डस अॅंड स्नूकर राज्य संघटनेच्या (बीएसएएम) अध्यक्षपदी पुण्याच्या राजन खिंवरसरा यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.  मुंबईत १२ मार्च रोजी पार्क क्लब येथे झालेल्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ही निवडणूक पार पडली. खिंवससा २०२१-२०२३ अशा आणखी एक टर्मसाठी अध्यक्षपद सांभाळतील.
सौमिल कारकेरा आणि मानव पांचाळ (उपाध्यक्ष); अमित सप्रू (जेटी सचिव);  शेखर सुर्वे (खजिनदार) प्रणव चिखल, विशाल मदन, आदित्य देशपांडे, राजवर्धन जोशी, विशाल गेहानी आणि  मौलिक मर्चंट (व्यवस्थापकीय समिती) अन्य सदस्य या बैठकीत निवडण्यात आले.
खिंवसरा हे भारतीय बिलियर्डस आणि स्नूकर महासंघाचेही अध्यक्ष आहेत. खिंवसरा हे २००६ ते २०२० या कालावधीत देशभारता झालेल्या विविध १३ राष्ट्रीय स्पर्धांचे मुख्य पुरस्कर्ते होते. भारतात झालेल्या दोन आशियाई आणि सहा विश्वचषक स्पर्धांचे देखिल ते प्रायोजक होते.
लहान शहरे आणि ग्रामीण भागातील जास्तीत जास्त क्षमता वापरण्यासाठी आणि नवीन खेळाडू/प्रतिभा समोर आणण्यासाठी त्यांनी पॅन इंडिया स्तरावर क्यू स्पोर्ट्सच्या मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी  नेहमीच भर दिला.त्याचबरोबर या खेळाला योग्य प्रसिद्धी मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले. भारतीय खेळातील स्थान आणि या खेळाचा आमच्या शालेय अभ्यासक्रमात आणि ऑलिम्पिकमध्ये समावेश केला जाण्याची इच्छा आहे. कोरोना महामारी आणि प्रचलित कोविड निर्बंध आणि मर्यादा पाळून 2021मध्ये भारताच्या क्यू-स्पोर्ट्स “88 वी बिलियर्ड्स आणि स्नूकर नॅशनल आणि 10 वी 6 रेड स्नूकर” यशस्वीपणे आयोजित केली. देशभरात ओमिक्रॉनच्या वाढीच्या अगदी आधी म्हणजे  24 नोव्हेंबर 2021 ते 29 डिसेंबर 2021 पर्यंत भोपाळमध्ये 36 दिवसांची अजिंक्यपद स्पर्धा यशस्वी पाडली. आजपर्यंत ज्या इर्षेने काम केले तसेच आणि तितक्याच आवेशाने आणि जिद्दीने यापुढेही काम करत राहू.  खेळाची ही गती अशीचअबाधित राहील याची काळजी घेऊ, असे श्री. खिंवसरा म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: