स्टींग ऑपरेशनचा तपास सीआयडीकडे; सरकारी वकील प्रविण चव्हाण यांचा राजीनामा

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिडीओ बॉम्ब नंतर या स्टींग ऑपरेशन मधील सरकारी वकील प्रविण चव्हाण यांचा राजीनामा घेण्यात आला असून; या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत दिली. तसेच यावेळी ‘फडणवीसानी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का? पोलिसांवर अविश्वास दाखवून सीबीआयकडे तपास देण्याची मागणी करणे अयोग्य आहे’, असाही टोला दिलीप वळसे पाटलांनी यावेळी लगावला.

मागील आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारी वकिलांवर आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते. हे आरोप करताना त्यांनी 125 तासांची व्हिडिओ रेकोर्डिंगचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला होता. आज व्हिडीओ बॉम्ब प्रश्नी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उत्तर दिले.

नव्या ऑडिओ क्लिपचीही सीआयडी चौकशी    

आज विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवा पेनड्राईव्ह सादर केला. यामध्ये एक ऑडिओ क्लिप आहे. यातील डॉ. मुद्दस्सिर लांबे यांचे संबंध दाऊदशी असून डॉ. मुद्दस्सिर लांबे आणि अर्शद खान यांच्यातील संभाषणाचा हा ऑडिओ असल्याचं त्यांनी सांगितलं. डॉ लांबे यांना राज्य सरकारने वक्फ बोर्डवरती घेतले आहे. मात्र एका सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेने त्यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार केली आहे, असंही फडणवीस म्हणाले. यावर उत्तर देताना दिलीप वळसे पाटील यांनी डॉ. लांबे यांची नियुक्ती कायदेशीर असून सदर प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत केली जाईल.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील काय म्हणाले –

  • फडणवीसानी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली का?
  • पोलीस दलावर अविश्वास दाखवून प्रत्येक केस ही सीबीआयकेडे द्यायची मागणी करने अयोग्य
  • महाराष्ट्राचं वातावरण हे बिघडवण्याचं काम केले जात आहे. सूडबुद्धीने कारवाई करणे चुकीचे
  • भाजपच्या काळात रश्मी शुक्ला यांनी बच्चू कडू, संजय काकडे आणि त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या नाना पटोले यांचे फोन टॅप केले
  • फोन टॅपिंग प्रकरणात संजय काकडे यांचं नाव परवेझ सुतार, बच्चू कडू यांचे निजामुद्दीन शेख बाबू तर त्यावेळी भाजपमध्ये असलेल्या नाना पटोले यांचे नाव अमजद खान असे ठेवण्यात आले
  • नवाब मलिक हे सातत्याने केंद्रावर आरोप करत होते, त्यांचे तोंड बंद करण्यासाठी जुनी प्रकरण बाहेर काढली.
  • अंबानींच्या घराखाली स्फोटक का सापडली याचे अद्याप उत्तर नाही. एनआयएच्या तपासात अद्याप झालेला नाही.

 

Leave a Reply

%d bloggers like this: