fbpx
Monday, May 27, 2024
Latest NewsPUNE

पीएमपीएमएल कडून स्वारगेट ते मेडिपॉईंट व डेक्कन ते मेडिपॉईंट हे दोन नवीन बसमार्ग सुरू

पुणे : पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक ८८ – स्वारगेट ते मेडिपॉईंट व मार्ग क्रमांक १०५ –
डेक्कन ते मेडिपॉईंट असे दोन नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत. पीएमपीएमएलचे संचालक प्रकाश ढोरे यांच्या हस्ते या दोन्ही बससेवांचा लोकार्पण सोहळा काल (दि.13) ४० औंध रोड येथे पार पडला.

याप्रसंगी माजी नगरसेवक आनंद छाजेड, भाजपचे पुणे शहर सरचिटणीस सुनिल माने, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, वाहतूक नियोजन व संचलन अधिकारी चंद्रकांत वरपे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, बालेवाडी आगार व्यवस्थापक दत्तात्रय माळी, स्वारगेट सहाय्यक आगार व्यवस्थापक विकास मते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रकाश ढोरे म्हणाले, “पीएमपीएमएलचे संचालक म्हणून काम करण्यासाठी अल्पावधी मिळाला; परंतु या अल्पावधीत देखील सर्वसामान्यांसाठी चांगले काम करू शकलो याचे समाधान आहे. तीन महिन्यांपूर्वी खडकी बाजार ते औंध अशी बससेवा सुरू केली. आता सदरचे दोन मार्ग सुरू केल्यामुळे या परिसरातील नागरिकांना स्वारगेट व डेक्कन येथे ये-जा करणेसाठी बससेवा उपलब्ध झाली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या बससेवांचा लाभ घ्यावा.”

मार्ग क्रमांक ८८ – स्वारगेट ते मेडिपॉईंट बससेवेचा मार्ग = स्वारगेट, अप्पा बळवंत चौक, शिवाजीनगर, ई स्क्वेअर, यशवंतनगर, खडकी स्टेशन, ४० औंध रोड, ब्रेमन चौक, परिहार चौक, मेडिपॉईंट असा आहे.

मार्ग क्रमांक १०५ – डेक्कन ते मेडिपॉईंट बससेवेचा मार्ग = डेक्कन, फर्ग्युसन कॉलेज रोड, शिवाजीनगर, ई स्क्वेअर, यशवंतनगर, खडकी स्टेशन, ४० औंध रोड, ब्रेमन चौक, परिहार चौक, मेडिपॉईंट असा आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading