लोकांना एकमेकांवरील आरोप – प्रत्यारोप ऐकण्यात अजितबात रस नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : प्रत्येकानं आपआपलं काम करावं. जनतेने ज्यांना पाठिंबा दिला आहे, लोकशाहीत जनता ज्यांच्या पाठिशी असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावं असं माझं मत आहे. यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर पदावरील व्यक्तीने कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, कसं सर्वांना घेऊन गेलं पाहिजे याचा आदर्श घालून दिला आहे. हे सर्व स्तरावर झालं पाहिजे. लोकांना एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप ऐकण्यात अजितबात रस नाही. असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे शहरात मॅरेथॉन दौरा करत असून तब्बल 31 कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. सकाळी एका कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले, फोन टॅपिंगप्रकरणी प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आलेल्या नोटिशीवर नोटीसा देण्याची परिस्थिती कधीही नव्हती. या संदर्भात वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणं योग्य नाही. मी पंतप्रधानांसमोर याबाबत थोडंबहुत विधान केलं होतं. नोटीशी देण्याची पद्धत राज्यात नव्हती. पण जबाबदार व्यक्तीनेही बोलताना भान बाळगलं पाहिजे.असं अजित पवार हे म्हणाले. जनतेला त्यांना त्यांच्या भागाचा विकास हवा आहे. असंही अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: