सहआरोपी असल्यासारखे प्रश्न मला विचारण्यात आले – देवेंद्र फडणवीस

मुंबई – पोलिसांच्या बदली अहवाल लीक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांची मुंबई सायबर क्राईम पोलिसांकडून चौकशी झाली. पोलिसांच्या बदल्यांबाबतचा राज्य सरकारने सहा महिने दाबून ठेवलेला घोटाळा मी बाहेर काढला. पण मुंबई पोलिसांनी याआधी दिलेल्या प्रश्नावलीत आणि आजच्या प्रश्नांमध्ये मोठा फरक असल्याचा तसेच मी साक्षीदार नव्हे तर आरोपी किंवा सहआरोपी असल्यासारखे प्रश्न मला विचारण्यात आले. असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला.

फडणवीस म्हणाले, मी विधानभवनात ज्या पद्धतीने दाऊद कनेक्शन दाखवले, विरोधी पक्षाविरोधात षडयंत्राचा गौप्यस्फोट केला आहे. म्हणूनच मी भ्रष्टाचार बाहेर काढतोय म्हणून माझ्याविरोधात हा दबाव आणला जातोय. पण या दबावाला बळी पडणार नाही, असाही खुलासा त्यांनी केला. ही सगळी राजकीय कारवाई असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

सगळ्या प्रश्नांचा रोख हा ऑफिशिअल सिक्रेसी अॅक्टचे उल्लंघन मी केला असा होता. पण घोटाळा काढून मी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नाही. मी जबाबदार नेत्यासारखा वागलो, त्याबाबतचे अग्रेसित केलेले पत्र हे केंद्रीय गृहसचिवांनाही हे पत्र पाठवले. पण या माहितीचे ट्रान्सस्क्रिप्ट किंवा पेनड्राईव्ह देणार नाही अशी भूमिका मी घेतली होती. पण नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती लीक केल्याचाही आरोप फडणवीस यांनी केला. ही माहिती आयपीएस पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधित असल्यानेच केंद्रीय गृहसचिव या ऑथोरिटीकडे ही माहिती मी दिल्याचेही फडणवीस म्हणाले.

पब्लिक डोमेनमध्ये कोणतेही मटेरिअल आणले नाही. सरकारने कितीही गोवण्याचा प्रयत्न केला, तरीही सरकार गोवू शकत नाही असाही दावा त्यांना केला. काळे कारनामे बाहेर काढले म्हणूनच ही राजकीय सूडाने झालेली कारवाई आहे. सगळ मटेरिअल हे प्रसिद्धीच्या मागे न लागता योग्य यंत्रणेकडे दिल्याचाही दावा त्यांनी केला. चौकशी स्टेटमेंटचा उपक्रम करून सरकारला हाती लागणार नाही. सरकारचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत असाही दावा त्यांनी केला.

मुंबई पोलिसांचे दोन अधिकारी या चौकशीसाठी आज दुपारी १२ वाजता सागर बंगल्यावर हजर झाले. डीसीपी हेमराज सिंह राजपूत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या उपस्थितीत ही जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई सायबर पोलिसांकडून याआधी २०२१ मध्ये टेलिग्राफ अॅक्ट आणि ऑफिशिअल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. आज दोन तास चौकशी झाली. पण पोलिसांनी पुन्हा येईन हे सांगितले नसल्याचा खुलासा फडणवीस यांनी केला.

Leave a Reply

%d bloggers like this: