अजित पवार यांच्या हस्ते पीएमपीच्या चार नवीन बस मार्गांचे लोकार्पण

पुणे : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित  पवार यांच्या शुभहस्ते पीएमपीएमएलच्या चार नवीन बस मार्गांचा लोकार्पण सोहळा रविवारी पार पडला. याप्रसंगी पुण्याचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक  प्रशांत जगताप, महाराष्ट्र राज्य पोलीस दल व महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, स्वारगेट आगार व्यवस्थापक राजेश कुदळे, हडपसर आगार व्यवस्थापक  सुभाष गायकवाड, सहाय्यक आगार व्यवस्थापक मोहन दडस यांची प्रमुख उपस्थिती होती.

पीएमपीएमएल कडून दि. १३/०३/२०२२ पासून १) मार्ग क्रमांक १७० – पुणे स्टेशन ते कोंढवा कौसरबाग

२) मार्ग क्रमांक १७८ – स्वारगेट ते एस.आर.पी.एफ. कॅम्प वानवडी
३) मार्ग क्रमांक १८१ – न.ता.वाडी ते आझादनगर वानवडी ४) मार्ग क्रमांक २८९ – हडपसर ते सिध्दार्थनगर साळुंके विहार असे चार नवीन बस मार्ग सुरू करण्यात आले.
१) मार्ग क्रमांक १७० – पुणे स्टेशन ते कोंढवा कौसरबाग या बससेवेचा मार्ग पुणे स्टेशन, पुलगेट, वानवडी, लुल्लानगर, दत्त मंदिर, कौसरबाग असा आहे.
२) मार्ग क्रमांक १७८ – स्वारगेट ते एस.आर.पी.एफ. कॅम्प वानवडी या बससेवेचा मार्ग स्वारगेट, पुलगेट, फातिमानगर, जगताप चौक, एस.आर.पी.एफ. कॅम्प वानवडी असा आहे.
३) मार्ग क्रमांक १८१ – न.ता.वाडी ते आझादनगर वानवडी या बससेवेचा मार्ग न.ता.वाडी, मनपा, अपोलो टॉकीज, नानापेठ, भवानीपेठ, पुलगेट, वानवडी कॉर्नर, जगताप चौक, साळुंके विहार, आझादनगर वानवडी असा आहे.
४) मार्ग क्रमांक २८९ – हडपसर ते सिध्दार्थनगर साळुंके विहार या बससेवेचा मार्ग हडपसर, फातिमानगर, जांभूळकर चौक, जगताप चौक, सिद्धार्थनगर साळुंके विहार असा आहे.
सध्या या चारही मार्गांवर प्रत्येकी एक बस धावणार असून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास या मार्गांवर बसेस वाढविल्या जातील.

Leave a Reply

%d bloggers like this: