निलॉन्स तर्फे ‘प्यार अचार और मौका’ मोहिमेचे आयोजन

भारतातील सर्वांत मोठ्या लोणच्यांचा ब्रॅन्ड असलेल्या निलॉन्स ने आपल्या ६० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून  भारतातील नवीन व्यावसायिकांमधील नाविन्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नवीन भागीदारी करण्याच्या आपल्या योजनेचा एक भाग म्हणून ‘प्यार अचार और मौका’ या मोहिमेची सुरुवात केली आहे. या मोहिमेची संकल्पना ओगिल्वी ची असून या संकल्पनेनुसार जनतेच्या थेट संपर्कातून भारतीय व्यावसायिकांमधील संपूर्ण क्षमतेचा उपयोग करून घेतला जाणार आहे.

संपूर्ण भारतीय भोजनाचा लोणचे हा एक अविभाज्य भाग असून त्याला सर्वसाधारणपणे अचार या नावाने संबोधले जाते.  म्हणूनच प्रत्येक भारतीय घरामध्ये तोंडाला पाणी सोडणार्‍या अचारची पाककृती प्राप्त करणे ही एक आव्हानात्मक गोष्ट नसते.  या स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या लोणच्याची अनोखी रेसिपी आणि त्याचे सँपल पाठवण्याची गरज आहे.  त्यांचे मुल्यमापन हे तज्ञांकडून विविध निकषांनुसार केली जाणार आहे.  ‍

या मोहिमे विषयी आपला उत्साह व्यक्त करतांना निलॉन्स चे व्यवस्थापकीय संचालक दिपक संघवी यांनी सांगितले “ तुम्ही जर निलॉन्स चा सहा दशकांचा प्रवास पाहिला तर आमचे पहिले यशस्वी उत्पादन म्हणजे लोणचे आहे.  आम्ही भाग्यवान आहोत की या मंचा मुळेच आम्ही भारतातील सर्वाधिक प्राधान्याचा ब्रॅन्ड बनलो, पण अशी संधी प्राप्त होण्यासाठी प्रत्येक जण इतका भाग्यशाली नसतो. म्हणूनच ६० व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आम्ही हीच संधी समाजातील घटकांना ‘प्यार अचार और मौका’ च्या माध्यमातून देऊ करत आहोत.  त्यांचा व्यवसाय वाढावा यासाठी आम्ही विजेत्यांना आम्ही उत्पादना पासून ते विपणना पर्यंत सर्व सहकार्य करणार आहोत. इतकेच नव्हे तर त्यांचे नाव आमच्या पॅकेजिंग वर झळकेल आणि विक्रीतून होणार्‍या नफ्यातीलही हिस्सा त्यांना मिळू शकेल. हे खूपच मोठे काम असूनही हा प्रवास उत्साहवर्धक आहे.  आम्ही हा प्रवास सुरू करत आहोत आणि यातून आम्ही लोकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकता वाढावी एक नवीन वातावरण निर्माण करत आहोत.”

या प्रवासात भाग घेऊ इच्छिणार्‍या व्यक्ती ३१ मार्च २०२२ पूर्वी  ८९५६५५७१९६ वर Hi  टाईप करु शकतात.

 

Leave a Reply

%d bloggers like this: