पीएमपीएमएल कडून सांगवी ते आळंदी नवीन बसमार्ग सुरू

पुणे : पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक ३४७ – सांगवी ते आळंदी नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर  उषा (माई) ढोरे यांच्या हस्ते सांगवी येथे या बसमार्गाचे उदघाटन करण्यात आले. आमदार  लक्ष्मण जगताप यांनी हा बसमार्ग सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

याप्रसंगी नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका शारदाताई सोनवणे, जवाहर ढोरे, पीएमपीएमएलचे सहाय्यक आगार व्यवस्थापक  गोविंद हांडे व सुनिल दिवाणजी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना महापौर उषा (माई) ढोरे म्हणाल्या,”आमदार लक्ष्मण  जगताप यांच्या संकल्पनेतून हा बसमार्ग सुरू होत आहे. या बससेवेमुळे सांगवी परिसरातून आळंदीला जाणाऱ्या भाविक भक्तांची चांगली सोय झाली आहे.”

मार्ग क्रमांक ३४७ – सांगवी ते आळंदी या बससेवेचा मार्ग सांगवी, फुगेवाडी, कासारवाडी, भोसरी, चऱ्होली फाटा, आळंदी असा आहे. सध्या या मार्गावर एक बस धावणार असून प्रवासी संख्या व उत्पन्न वाढल्यास या मार्गांवर बसेस वाढविल्या जातील. दिवसभरात एकूण ८ फेऱ्या होणार आहेत. सांगवी ते आळंदी पहिली बस सकाळी ७.४० वा. तर शेवटची बस सायंकाळी ६.३५ वा. आहे. तसेच आळंदी ते सांगवी पहिली बस सकाळी ९.०० वा. तर शेवटची बस रात्री ८.०० वा. आहे. कार्यक्रमास  दिलीप तनपुरे,  धनंजय ढोरे,  संतोष ढोरे, आप्पा ठाकर, कृष्णा भंडलकर, दर्शना कुंभारकर,  भूषण शिंदे,  कमलाकर जाधव, बंडोपंत शेळके,  बाळासाहेब शितोळे, मेघनाथ पुंगडे, शिवाजी ढोरे, अनिल ढोरे, बाबासाहेब बंडगर, राजेंद्र बुट्टे पाटील यांच्यासह महिला व ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: