झी महागौरव २०२२ मध्ये करिष्मा कपूरची हजेरी  

मराठी नाटक चित्रपटांसाठीच ‘झी मराठी’चं हे समृद्ध नातं सन २००० पासून सुरु झालं होतं. मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी गौरव २०२२ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.  गेल्या २१ वर्षातल्या, २१ महत्वाच्या चित्रपटांचा गौरव करून त्यांनी मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीसाठी केलेल्या महान कार्याचा महागौरव यंदा झी गौरव पुरस्कार सोहळ्यात करण्यात आला. या सोहळ्याचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा सुपरस्टार स्वप्नील जोशी याने केलं.
या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिष्मा कपूर आणि विनोदवीर जॉनी लिव्हर यांच्यासोबत श्रेयस तळपदे, नागराज मंजुळे, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर, प्रार्थना बेहेरे, सई ताम्हणकर, प्रिया बापट, उर्मिला कानिटकर, संजय जाधव, ललित प्रभाकर, वैदेही परशुरामी, रवी जाधव, केतकी माटेगावकर आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.  इतकंच नव्हे तर करिष्मा कपूर हि झी महागौरवच्या मंचावर थिरकली सुद्धा. तिच्या अप्रतिम नृत्याविष्काराला उपस्थित कलाकारांकडून भरभरून दाद मिळाली.
कुठल्या कलाकारांनी विजेतेपद पटकावलं हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.

Leave a Reply

%d bloggers like this: