fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

पुणे महापालिकेची निवडणूक नेमकी कधी होणार? इच्छुक उमदेवारांना उत्सुकता

पुणे : आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा प्रसिद्ध झाल्यापासून शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र महापालिकेची निवडणूक नेमकी कधी होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. त्याबद्दल तर्क-वितर्क जोडत आहेत. इतके दिवस ज्यांनी उमेदवारीची जोरदार तयारी केली होती, त्यांनी सध्या सावध भूमिका घेतली असली, तरी वाटचाल सुरूच ठेवली आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षातील स्थानिक नेते मोठ्या जोमाने तयारी लागले आहेता. याबरोबरच राजकीय पक्षातिला वरिष्ठ नेत्यांनी शहरातील अनेक इच्छुक व भेटीगाठी वाढवल्या आहेत.

ओबीसी राजकीय आरक्षण विषयावरून सुप्रीम कोर्टाने आदेश दिले. त्यानुसार तूर्त तरी हे आरक्षण रद्द झाले. पण, कायद्यातून मार्ग शोधत राज्य सरकारने विधिमंडळात बिल मांडत राज्य निवडणूक आयोगाकडे असलेले सर्व अधिकार आपल्या ताब्यात घेतले आहेत. या बिलावर राज्यपालांची स्वाक्षरी होणे बाकी आहे. ही स्वाक्षरी होताच निवडणुकीची पुढील तयारी राज्य सरकार करू शकेल. पण, येथून पुढची प्रशासकीय प्रक्रिया काय? याचेच अंदाज राजकीय मंडळी बांधत आहेत दरम्यानच्या काळात पुण्यातील प्रभाग रचनाही जाहीर झाली होती. त्यावर हरकती आणि सुनावण्यांचा टप्पाही पार पडला आहे.

ओबीसी आरक्षणामुळे आता कायदेशीर पेच निर्माण झाल्याने नुकतीच जाहीर झालेली प्रभाग रचना कायम राहील का? की ती नव्याने केली जाईल, ज्या प्रभागांच्या रचनेबाबत सर्वाधिक आक्षेप आले, त्यांच्याबाबत भूमिका कोण घेणार? कारण एकीकडे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या टप्प्यांची अंमलबजावणी सुरू असताना, दुसऱ्या बाजूला ही सर्व प्रक्रिया राज्य सरकार हाती घेण्याच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे येथून पुढील वाटचाल काय असू शकते, याची उत्तरे ही राजकीय मंडळी शोधत आहेत. दुसरीकडे पुणे महापालिकेत 60 वर्षांनंतर प्रथमच प्रशासक नेमण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हे कामकाज कसे चालेल. याबाबत मार्गदर्शन मागवले जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading