fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

शून्य टक्के कमिशननंतर मिशो तर्फे विक्रेत्यांकरता या उद्योगक्षेत्रातील पहिल्या ‘झिरो पेनॉल्टी’ आणि ‘सेवन डे पेमेंट्स’ योजना सादर

पुणे : भारतातील वेगाने वाढत असलेली इंटरनेट कॉमर्स कंपनी मिशो तर्फे आपल्या विक्रेत्यांसाठी या उद्योगक्षेत्रातील पहिलेवहिले ‘झिरो पेनॉल्टी’ आणि ‘सेवन डे पेमेंट्स’ असे दोन नवीन उपक्रम सादर करण्यात आले. इ-कॉमर्स साठी प्रथमच सादर करण्यात आलेली ही दोन वैशिष्ट्ये मिशोवर नोंदणी करण्यात आलेल्या सर्व विक्रेत्यांना उपलब्ध होतील. त्यायोगे ऑनलाईन काम करण्यासाठी छोट्य आणि मध्यम व्यवसायांकरता कामकाज क्षेत्राची निर्मिती करण्यात येत आहे.

देशभरातील ४ लाखांहून अधिक विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसायाचे डिजिटलीकरण करायला मदत करताना ‘शून्य पेनॉल्टी’ वैशिष्ट्यामुळे विक्रेत्यांना ऑर्डर स्वतःकडून किंवा आपोआप रद्द झाली तरी त्याचा दंड बसणार नाही. विक्रेता दंड रद्द करायला सुरुवात करणारी मिशो पहिली कंपनी होती आणि रद्द होणाऱ्या ऑर्डर संदर्भात दंड न टाकण्याच्या सुविधेमुळे मिशो हा भारतातील विक्रेत्यांसाठी पहिला “झिरो पेनॉल्टी” प्लॅटफॉर्म बनला आहे. कंपनीने मजबूत माहितीधिष्टीत प्रारूपे तयार केली असल्यामुळे ग्राहकांनाही चांगला अनुभव मिळतो तर विक्रेत्यांचेही नुकसान होत नाही. या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या विक्रेत्यांमध्ये विश्वास आणि पारदर्शकता यांना बळकटी देण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

“सेवन डे पेमेंट्स” वैशिष्ट्य विक्रेत्यांना वेगाने पैसे मिळतील याची खातरजमा करते. त्यामुळे विक्रेत्यांनाही त्यांच्या व्यवसायात पुन्हा गुंतवणूक करायला मदत होते. त्यांच्या सातत्यपूर्ण विकास आणि यशासाठी भांडवल सक्षम असणे महत्वाचे आहे.

मिशोच्या पुरवठा विकास विभागाचे सीएक्सओ लक्ष्मीनारायण स्वामिनाथन म्हणाले, “ऑफलाईन व्यवसायातून ऑनलाईन व्यवसाय पद्धतीत सामावून घेताना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना किती आव्हानांचा सामना करावा लागतो याची आम्हांला जाणीव आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांचा अधिक विकास आणि त्यांचे नफ्याचे प्रमाण वाढवून त्यांना सक्षम करण्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्मची बांधणी करत आहोत. विक्रेत्यांसाठी शून्य टक्के कमिशन आकारणारी मिशो ही देशातली पहिली इ-कॉमर्स कंपनी आहे. त्यानंतर आमच्या प्लॅटफॉर्मवर विक्रेत्यांच्या संख्येत तीनपट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या नवीन ‘शून्य पेनॉल्टी’ आणि ‘सेवन डे पेमेंट्स’ उपक्रमामुळे मिशोवर विक्रेता अधिग्रहण आणि यश यांचा आलेख अधिक उंचावेल याची आम्हांला खात्री आहे. या आणि अशा प्रकरच्या इतर अनेक विक्रेता पूरक वैशिष्ट्यांमुळे भारतभरातील लाखो छोट्या व्यावसायिकांमध्ये त्यांचा व्यवसाय ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी आणि मिशो वर यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading