सरहदमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

पुणे : सरहद व स्वरगंधार संस्थेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी  चंद्रकांतदादा वानखेडे (सुप्रसिद्ध साहित्यीक) उपस्थित होते.  सुषमा संजय नहार सेक्रेटरी, सरहद यांच्या हस्ते सन्मानार्थी गौरव करण्यात आला. यामध्ये नीरजा आपटे यांना (निवेदनक्षेत्र), स्वाती डिंबळे (सामाजिक क्षेत्र), जागृती धर्माधिकारी (शैक्षणिक क्षेत्र), संध्या गायकवाड (शैक्षणिक क्षेत्र), डॉ. सुप्रिया पाटील (शैक्षणिक क्षेत्र), सुप्रिया शिंदे (शिल्पकला क्षेत्र) अशा वेगवेगळ्या क्षेत्रात अलौकिक कामगिरी करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणार्‍या रणरागिनींना महिला दिनाच्या निमित्ताने गौरवण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेश वाडेकर (विश्वस्त सरहद) व गोपाळ कांबळे (संस्थापक स्वरगंधार) यांनी केले.

कार्यक्रमप्रसंगी बोलताना अध्यक्षस्थानावरून  चंद्रकांतदादा वानखेड म्हणाले, “मातृत्वाची आणि कर्तृत्वाची साकार मूर्ती म्हणजे स्त्री आहे. तिच्या सर्व रूपांचा सन्मान व्हायला हवा.” तसेच सरहद संस्थेने घेतलेल्या या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. मयुर मसुरकर सरहद समन्वयक यांनी उत्तम प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे सुद्धा विशेष कौतुक यानिमित्ताने त्यांनी केले.
तसेच पल्लवी पासलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले व सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमेश सुर्यवंशी यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: