महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच विजय होईल; महाराष्ट्र तयार आहे – शरद पवार 

मुंबई :  आज पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा आदींसह पाच महत्वाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. त्यापैकी चार राज्यात भाजप तर एका राज्यात आम आदमी पक्षाला बहुमत मिळविले आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रात आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होईल. यावर एक पत्रकाराने विचारले की “अभी महाराष्ट्र बाकी है ” त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले ‘महाराष्ट्र भी तय्यार है’.

पंजाबचा निकाल कॉंग्रेससाठी मोठा धक्का  

निवडणुकीच्या निकालावर बोलताना पवार म्हणाले की, पंजाबमधील बदल हा काँग्रेस पक्षाला मोठा धक्का आहे. आप (आम आदमी पार्टी) हा एक नवीन पक्ष आहे ज्याने दिल्लीत दोनदा विजय मिळवला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने त्या राज्याचा कारभार चालवला त्यावरून पंजाबच्या जनतेने त्यांना कौल दिला. पंजाब हा दिल्लीचा शेजारी असल्याने पंजाबमधील लोकांनी आपच्या कार्याच्या आधारे आपचा पर्याय निवडला. हा बदल भाजपसाठी चांगला नाही आणि काँग्रेसला मोठा धक्का आहे.

फोटो- संग्रही

 

Leave a Reply

%d bloggers like this: