पुण्यात अवतरले मोदी आणि योगी
पुणे:पंजाब , मणिपूर, गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश च्या आज विधानसभेच्या निवडणूकीचा आज निकाल लागत आहे. यामध्ये गोवा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये भाजप ला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे पुण्यात लोखंडे तालीम चौक येथे नगसेवक राजेश येनपुरे यांनी व त्याच्या कार्यक्रत्यानी भारतीय जनता पार्टी ची सत्ता येईल म्हणून जल्लोष साजरा करायला सुरुवात केला आहे. पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांचे पुतळे ठेवून जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुण्यात चक्क मोदी व योगीनाथ अवतरल्याचे दिसून आले.
