पुणे महापालिकेत पण भाजपची सत्ता येणार – जगदीश मुळीक

पुणे: आज भाजप पंजाब, गोवा,उत्तराखंड,उत्तर प्रदेश विधान सभा निवडणूकीचे निकाल लागत आहे. त्यात भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळत आहे. त्यामुळे पुण्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पुणे शहर भाजप कार्यालया समोर पेढे व जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा केला.

या वेळी भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक गणेश घोष, भाजपचे पुणे शहर प्रवक्ते पुष्कर तुळजापूरकर व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगदीश मुळीक म्हणाले,आज भाजप पंजाब, गोवा,उत्तराखंड,उत्तर प्रदेश विधान सभा निवडणूकीचे निकाल लागत आहे. यात भारतीय जनता पार्टी ला स्पष्ट बहुमत मिळेल. भारतीय जनता पार्टी काँग्रेसला सत्ता कधी हीमिळवून देणार नाही. येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी निवडून येईल. असा विश्‍वास जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

%d bloggers like this: