समाजामध्ये क्रांती घडविण्यासाठी स्त्रियांचा पुढाकार महत्त्वाचा – समाजसेविका प्रतिभा शाहू मोडक
पुणे : स्त्री ला आदिशक्तीचे स्वरुप मानले जाते. विद्येसाठी सरस्वतीची उपासना केली जाते. शक्तीसाठी कालीची उपासना केली जाते, तर धनासाठी लक्ष्मीची उपासना केली जाते. त्यामुळे मानवी समाजात स्त्रीयांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. समाजामध्ये क्रांती घडवायची असेल, तर स्त्रियांचा पुढाकार महत्त्वाचा आहे, असे मत लेखिका आणि समाजसेविका प्रतिभा शाहू मोडक यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना, पुणे शहराच्यावतीने महिला दिनानिमित्त रक्तदान शिबीर आणि महिला पत्रकारांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. रक्तदान शिबीराचे उद्घाटन पुण्यातील मानाचे गणपती असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवतींच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. यामध्ये कसबा गणपती मंडळाच्या उपाध्यक्षा दिपा तावरे, गुरुजी तालीम मंडळाच्या सीमा परदेशी, तुळशीबाग मंडळाच्या स्वप्नाली नितीन पंडित, सेवा मित्र मंडळाच्या वंदना शिरीष मोहिते, साईनाथ मंडळाच्या गंधाली पियुष शहा यावेळी उपस्थित होते. या रक्तदान शिबीरात ४१ रक्ताच्या बॉटल्सचे संकलन करण्यात आले.
तसेच, यावेळी ११ कर्तुत्ववान महिला पत्रकार भगिनींचा विशेष सन्मान जेष्ठ कवयित्री, साहित्यिक प्रतिभाताई शाहू मोडक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्षा सुशीला नेटके, शहराध्यक्षा वनिता वागस्कर, उषा काळे, पुष्पा कनोजिया, सुरेखा मकवान, संगिता तिकोने, कल्याणी सराफ, राजेंद्र वागस्कर, किशोर शिंदे, गणेश सातपुते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन जयश्री पाथरकर, ज्योती खुटवड, मीना पवार, मृणालिनी बोकील, पुष्पलता पाटील, पूनम गुंजाळ, आरती सहाणे, देवश्री तळेकर, सानिका देवधर यांनी केले.
शिवानी पांढरे, चैत्राली राजापूरकर, प्रज्ञा केळकर, नुपुर पाटील, कल्पना खरे, निलम कारळे, नम्रता कामत. नेहा सराफ, रिना महामुनी पतंगे, अश्विनी सातव डोके, सुखदा खांडगे या महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. डॉ. अरुंधती पोतदार यांनी सूत्रसंचालन यांनी केले.
