काही जण आजारी नसतानाही राजकारणात सक्रिय नसतात संजय राऊत यांचा राज ठाकरेंना टोला

पुणे: आज मनसेला सोळा वर्षे पूर्ण झाली आहेत. मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंनी तब्बल दोन वर्षांनंतर त्यांच्या खास शैलीत धडाडीने भाषण केलं. त्यावेळी त्यांनी नेत्यांचा तर समाचार घेतला. यामध्ये राज्यसभा खासदार संजय राऊत यांची देखील त्यांनी नक्कल करत त्यांच्यावर तुफान टोलेबाजी केली.

इतकंच नाही तर निवडणुका पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरुन राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी समाजाचं कारण पुढे करण्यात आलं. पण खरं कारण वेगळंच असल्याचं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर बोट ठेवलं.

दरम्यान यावर आता संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया देत राज ठाकरेंना टोला लगावला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले कि, “मुख्यमंत्री आजारी असताना देखील सक्रिय आहेत परंतु काही जण आजारी नसताना देखील सक्रिय नाहीत” असा खरमरीत टोला राज ठाकरे यांना संजय राऊतांनी लगावला आहे

Leave a Reply

%d bloggers like this: