Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

फेरफार अदालतीमध्ये ३ हजार २२१ नोंदी निर्गत

 

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचा पुढाकार

पुणे दि ९: जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्ह्यात झालेल्या फेरफार अदालतीला नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून या फेरफार अदालतीमध्ये एकुण ३ हजार २२१ नोंदी निर्गत करण्यात आल्या.

जिल्ह्यात यापुर्वी झालेल्या फेरफार अदालतीपेक्षा या फेरफार अदालतीचे स्वरुप विशेष होते. या फेरफार अदालतीमध्ये नोंदी निर्गतीबरोबर सातबारामधील चुकांच्या दुरुस्तीचे काम देखील करण्यात आले. फेरफार अदालतीसाठी नायब तहसिलदार व मंडळ अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी कामकाज पाहिले. नोंदी निर्गती बरोबर सातबारा विसंगत दुरुस्ती करण्यासाठी सुनावणी नोटीसा बजविण्याचे कामदेखील करण्यात आले. ई-पीक पाहणीमध्ये रब्बी हंगामासाठी पीकांची नोंदणी करण्यासाठी १५ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याचे नागरिकांना अवगत करणेत आले. पीक पाहणीमध्ये जास्तीत जास्त खातेदार नोंदणी करण्यासाठी या फेरफार अदालतीमध्ये माहिती देण्याचे कामदेखील यावेळी करण्यात आले.

१ मार्च ते ८ मार्च या कालावधीमध्ये विशेष मोहिम स्वरुपात कामकाज करण्यात आले असून उर्वरीत कामकाज मार्चअखेर पुर्ण करण्याचे नियोजन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका निहाय करण्यात आले आहे.

विसंगत सर्व्हे क्रमांकाची ( ODC अहवाल १ ते ४१) संख्या विशेष मोहिम घेण्यापुर्वी १३ हजार ८० इतकी होती. पहिल्या आठवड्यातच १ हजार ८३१ विसंगत सर्व्हेचे कामकाज पुर्ण करण्यात आले. उर्वरीत ११ हजार २४९ गटांचे दुरुस्तीचे कामकाज मार्चअखेर करण्याचे उद्दिष्ट आहे.

डिजीटल साईन सातबारा करण्यावर शिल्लक संख्या विशेष मोहिम घेण्यापुर्वी १० हजार ४४६ इतकी होती. पहिल्या आठवड्यात १ हजार ९९६ गटांचे डिजीटल साईन काम पुर्ण झाले असून उर्वरीत ९ हजार २५० एवढे गट सातबारा डिजीटल साईन करण्याचे कामकाज मार्चअखेर करण्याचे नियोजन आहे.

ई पीक पाहणीमध्ये जिल्ह्यात मार्च महिन्यातील १ ते ८ मार्च या कालावधीतील विशेष मोहिमेमध्ये ४१ हजार ६५६ खातेदारांची नोंदणी करण्यात आली असून मार्च अखेर जास्तीत जास्त खातेदारांना सहभागी करुन घेण्याचे नियोजन आहे. आज ५ लाख ७० हजार ४४८ खातेदारांची नोंदणी पुर्ण झाली आहे.

पुणे जिल्ह्यात आज अखेर १० लक्ष ७० हजार नोंदी भरण्यात आल्या असून त्यापैकी केवळ ७ हजार १५५ नोंदी मुदतीवरील प्रमाणीकरणासाठी शिल्लक आहेत. तांत्रिक कारण, अपिलात स्थगिती असलेल्या नोंदी बाबतची माहिती संकलित करण्याचे कामकाज सुरू आहे. प्रलंबित तक्रार केसेस जलदगतीने निर्गत करणे शक्य होणार आहे. फेरफार विषयक केले जाणारे नाविन्यपुर्ण कामकाज मार्च महिन्यात दर बुधवारी फेरफार
अदालत मंडळ मुख्यालयी घेण्यात येणार आहे.

येणाऱ्या फेरफार अदालतीपासून नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित संजय गांधी, रेशनकार्ड महसूल विभागाशी संबंधित अर्ज फेरफार अदालतीमध्ये स्विकरण्याच्या कामकाजाबाबत भर देण्यात येणार असून त्याप्रमाणे सर्व उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत, असे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading