एम.फिल ते पीएचडी सलग पाच वर्षे फेलोशिप मिळावी या मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या विद्यार्थ्यांना रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा पाठिंबा

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे ( बार्टी ) च्या माध्यमातून देण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती ( BANRF २०१८ ) मात्र एम.फिल ते पीएच.डी साठी सलग अधिछात्रवृत्ती देण्यापासून वंचित ठेवले जात असल्याने अनुसूचित जातीच्या संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
सामाजिक न्याय विभागाचे लक्ष वेधण्याकरिता संशोधक विद्यार्थ्यांनी परळी येथे सलग 9 दिवस उपोषण केले होते एक ते दीड महिन्याच्या आत फेलोशिप चा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देऊन त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यात आले परंतु खोट्या-फसव्या आश्वासनामुळे अद्यापही प्रश्न मार्गी न लागण्याने विद्यार्थ्यांनी न्याय मागण्यासाठी आंदोलनाचे अस्त्र बाहेर काढत बार्टीच्या पुणे येथील कार्यालयावर ८ मार्च पासून आमरण उपोषणाला बसले आहेत .
रिपब्लिकन सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने आज बार्टी कार्यालय, पुणे येथे आंदोलक विद्यार्थी मित्रांची भेट घेऊन रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. संशोधक विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यापूर्ण होण्यासाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेना पूर्ण ताकदीनिशी विद्यार्थ्यांच्या सोबत राहणार आहे. असे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांनी सांगितले. 

 

Leave a Reply

%d bloggers like this: