शंभूबलिदान दिन हा मृत्युंजय रक्तदान दिन म्हणून जाहीर करावा

पुणे : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन तथा मृत्युंजय दिन दिनांक ११ मार्च हा दिवस मृत्युंजय रक्तदान दिन म्हणुन महाराष्ट्र सरकारने जाहीर करावा अणि या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राभर रक्तदान चळवळीतून संभाजी महाराजांना मानवंदना द्यावी, अशी मागणी शिवजयंती महोत्सव समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी केली आहे. तसेच पुण्यामध्ये ११ मार्च २०२२ रोजी म्हात्रे पूलाजवळील सृष्टी गार्डन येथे सकाळी ९ ते ५ या वेळेत भव्य रक्तदान मानवंदनेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सचिन पायगुडे, संजय पासलकर, रवींद्र कंक, प्रकाश ढमढेरे, शंकर कडू, शिरीष मोहिते, निलेश जेधे, गोपी पवार सागर पवार, प्रवीणभय्या गायकवाड, शिवाजी साळुंखे, किरण शितोळे, रमेश परदेशी तसेच गणेशोत्सव मंडळे, वारकरी संप्रदाय, क्रिडा, शिक्षण संस्था, सिने कलाकार, ढोलताशा पथके यासह विविध क्षेत्रातील समन्वयक उपस्थित होते.

अमित गायकवाड म्हणाले, ज्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी रक्ताचा थेंबन्थेंब अर्पण केला. स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी, मायभूमीचे रक्षण करण्यासाठी, सर्वांचे रक्षण करण्यासाठी त्या स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना रक्तदानातुन मानवंदना देऊयात, रक्ताच पांग रक्तान फेडूयात रक्ताच रक्ताशी नात जोडूयात हि जाणीव जपत गेली ८ वर्षे आम्ही रक्तदान मानवंदना आयोजित करीत आहोत. यामध्ये शिवजन्मोत्यव स्वराज्यरथ सोहळ्यातील वीर स्वराज्यघराणी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, वारकरी संप्रदाय, क्रिडा संघटना, सहकार, शिक्षण संस्था, वाहतूक संस्था, ढोलताशा पथके उपहार गृह संघटना, सिने कलाकार संघटना यासह विवीध क्षेत्रातील लोकांना आम्ही सहभागी केले आहे.त्यामुळे आमचा संकल्प नक्कीच पुर्ण होईल याच आम्हाला विश्वास आहे.

रक्तदान मानवंदने मध्ये शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याच्या जिजाऊ मॉ साहेब शहाजी महाराज शिवज्योत स्वराज्यरथाच्या नेतृत्वाखाली विवीध संस्था सहभागी होणार आहेत. स्वराज्यभूमी कृष्णसुंदर गार्डन येथे पार पडलेल्या रक्तदान मानवंदनेच्या पुर्वतयारी बैठकी मध्ये रक्तदाता फॉर्म वाटप देखील पार पडले.

Leave a Reply

%d bloggers like this: