वर्ल्ड  हियरिंग मंथ मध्ये कॉक्लिया पुणे फॉर हियरिंग एंड स्पीच सेंटरकडून मुफ्त श्रवणशक्ती तपासणी

पुणे : भारतात जन्मजात श्रवणशक्ती कमी असण्याची समस्या ही एक गंभीर समस्या आहे.  भारतात दरवर्षी सुमारे १ लाख मुले श्रवणदोष घेऊन जन्माला येतात. महाराष्ट्राविषयी बोलायचे झाले तर, सुमारे ४५००-५००० जन्मजात श्रवणशक्ती कमी असणारी मुले जन्माला येतात. ३ मार्च हा जागतिक श्रवण दिन असुन कोक्लिया पुणे संपूर्ण मार्च महिनाच श्रवन दिनासारखाच पाळतात, जेथे पालक त्यांच्या नवजात किंवा लहान मुलांना मोफत श्रवण तपासणी चाचणीसाठी पुण्यातील कॉक्लिया पुणे फॉर हियरिंग एंड स्पीच सेंटर येथे आणू शकतात.

लवकर निदान आणि दखल घणे का आवश्यक आहे- श्रवणशक्ती कमी होणे हे एक छुपे अपंगत्व आहे कारण यात मूल शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सामान्य असते. अशा प्रकारे, बहिरेपणाचे निदान होईपर्यंत, मुल ३-४ वर्षेंचे होते जन्मजात श्रवणशक्ती कमी होण्याचा सर्वात मोठा परिणाम भाषा आणि उच्चारच्या विकासावर होतो, कारण मानवी मेंदूची भाषा आणि बोलने शिकण्याची प्रवृत्ती फक्त 6 वर्षांपर्यंत असते. याचा परिणाम जन्मजात बालकांच्या शिक्षणावर, व्यक्तिमत्वावर, संवाद आणि सामाजिक कौशल्यांवरही होतो.श्रवण उपचार न केल्याने बहुतेक वेळा याचा परिणाम शैक्षणिक यशावर होतो ज्यामुळे नंतरच्या आयुष्यात रोजगाराच्या संधी कमी होतात. ज्याचे मोठे भावनिक आणि मानसिक परिणाम होतात जसे की एकटेपणाची भावना,नैराश्य इ.

मीडियाशी संवाद साधताना, डॉ. अक्षय वाचासुंदर, ईएनटी सर्जन म्हणाले- “सर्व बाळांची 1 महिन्यापेक्षा कमी वयाच्या श्रवणशक्तीची तपासणी केली पाहिजे. जन्मानंतर रुग्णालयातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांची तपासणी केली गेली तर उत्तम. ज्यासाठी ओएई (OAE) चाचणी करून घेतली जाते. जर बाळाने ही श्रवण तपासणी उत्तीर्ण केली नाही, तर शक्य तितक्या लवकर पूर्ण श्रवण चाचणी घेणे खूप महत्वाचे आहे, परंतु 3 महिन्यांच्या नंतर नाही. विशिष्ट जोखीम असलेल्या नवजात मुलांसाठी हा सल्ला दिला जातो, उदा., ज्या नवजात बाळांवर ५ दिवसापेक्षा जास्त काळ अतिदक्षता विभागात उपचार केले गेले आहेत किंवा जे वेंटिलेटरवर होते, त्यांची त्वरित तपासणीसाठी करावी. कमी वयात श्रवणशक्ती कमी झाल्याचे आढळल्यास श्रवणयंत्र/कॉक्लियर इम्प्लांट आणि स्पीच थेरपीच्या मदतीने उपचार केले जाऊ शकतात ज्यामुळे श्रवण अक्षमतेवर मात करण्यात मदत होईल.”

Leave a Reply

%d bloggers like this: