उद्योजकांनी “आर्ट ऑफ गिव्हिंग’चे तत्व आत्मसात करत,सामाजिक विकासात योगदान दयावा – संजीव ओगले

पुणे : “” उद्योजकांनी कमावलेल्या पैशांपैकी काही भाग समाजातील गरजू लोकांसाठी दिला पाहिजे. तुमचा पैसा हा केवळ तुमच्यासाठी नाही तर समाजातील काही लोकांचाही त्यावर हक्क आहे. या मानसिकतेतून काम केले तर चांगल्या गोष्टी नक्की घडतील आणि तुमच्या चांगल्या कार्याचा उपयोग नक्कीच तुम्हालाही होईल. त्यामुळे उद्योजकांनी “आर्ट ऑफ गिव्हिंग’च्या तत्वाचा अवलंब केला पाहिजे,” असे मत उद्योजक संजीव ओगले यांनी व्यक्त केले.

ग्रो-वेल बिझनेस असोसिएटस (जीबीए) या महिला आणि लघु-उद्योजकांची संस्था आणि स्वप्नगंधा कलेक्‍शन यांच्या सहकार्याने महिला व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित छोटे व्यावसायिक प्रदर्शनाच्या उदघटनाप्रसंगी ते बोलत होते.

संस्थेचे संस्थापक नितीन कुलकर्णी, स्वप्नगंधा कलेक्‍शन’च्या ऋजुता गोखले यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिला उद्योजकांना मार्गदर्शन करताना ओगले म्हणाले,”” आपण मुलांना वाढवतो पण आपणच त्यांना सांगतो की अरे हे तुझे काम नाही, त्यामुळे त्यांच्यातील कामाचा उत्साह संपून जातो. मुलांना सर्व प्रकारच्या कामाची सवय असलीच पाहिजे. मागच्या पिढीच्या संस्कारामुळे नवीन पिढीला उद्योग करणे अवघड होते. त्यामुळे उद्योजकांनी सर्व प्रकारचे काम करायला शिकले पाहिजे.”

उद्योजकांनी लोकांनी आपल्याकडून वस्तू घ्याव्यात केवळ हा विचार न करता, आपणही इतरांकडून त्यांची उत्पादने विकत घेतली पाहिजे, याचा विचार करावा. त्यातूनच उद्योगाच्या विकासाला मदत मिळेल. त्याचबरोबर इतर उद्योगांशी संवाद, परस्पर संबंध वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे कुलकर्णी यांनी सांगितले. कार्यक्रमात स्वप्नगंधा कलेक्‍शन’तर्फे महिला दिनाचे औचित्य साधत विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

यामध्ये मेमरी गेमसाठी यशस्वी कुलकर्णी, प्रिया कुलकर्णी यांना,क्विक स्पीचसाठी पौर्णिमा कुलकर्णी यांना, गुडी आणि पारंपरिक वेषातील फोटोसाठी अर्चना महाजन यांना, श्रावणी सोहनी आणि अनुजा कुलकर्णी यांना वैचारिक लेख स्पर्धेसाठी, उत्कृष्ट गणपती आराससाठी ज्योती सरदेशमुख यांना, मेहंदी स्पर्धेसाठी मानसी अनगळ, गौरी सजावट स्पर्धेसाठी अंजली कुलकर्णी आणि पौर्णिमा कुलकर्णी यांना तर संक्रांतीनिमित्त उखाणा स्पर्धेसाठी ऋजुता गोखले, ऍड तेजस्वीनी जोशी, अर्चना महाजन यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात उल्लेखनीय कार्यासाठी काही विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रिया कुलकर्णी, ऍड आकांक्षा पुराणिक, गजानन गाडगीळ, ऋजुता गोखले लोकेश देवकुलकर, अनुजा कुलकर्णी, स्मिता सोहनी यांचा समावेश होता. कार्यक्रमात पूजा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: