एसएनबीपी २८वी नेहरू अखिल भारतीय पुरूष आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धा पुण्यात.

पुणे: क्रीडानगरी पुण्यात प्रथमच २८ वी नेहरू अखिल भारतीय पुरूष गटाची आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेचे (आंतर विभागीय अंतिम स्पर्धा) आयोजन मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, पिंपरी येथे बुधवार ९ मार्च २०२२ पासून होणार आहे. असोसिएशन ऑफ इंडियन युर्निर्व्हसिटीजच्या मान्यतेने ११ दिवस चालणाऱ्या या भारतातील महत्वाच्या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युट आहेत.

या महत्वाच्या स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी दिनांक १९ मार्च राजी होइल.

या स्पर्धेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अव्वल आठ फिनिशर्स उपांत्यपूर्व फेरीतील, बेंगळुरू येथे होणाऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2022 साठी पात्र ठरतील.

प्रतिष्ठेच्या या सामन्यात चार विभागातील (दक्षिण, पुर्व, उत्तर आणि पश्चिम) १६ विद्यापीठ संघ जेतेपदासाठी एकमेकांविरूध्द प्रथम साखळी व नंतर बाद पध्दतीच्या सामन्यात पुण्यात लढणार आहे.

आंतर विभागीय स्पर्धेत पात्र झालेल्या स्पर्धांमधून गुरूनानक देव विद्यापीठ, अमृतसर; पंजाब विद्यापीठ, पतियाला, कुरूकक्षेत्र विद्यापीठ, आणि लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवारा (उत्तर विभाग), बेंगलुरू सिटी विद्यापीठ, बेंगलुरू विद्यापीठ, एसआरएम विद्यापीठ, चेन्नई व मनोमन्यूम सुंदरनार विद्यापीठ, तिरूनलवेली (दक्षिण विभाग); एमजी काशी विद्यापीठ, संभलपूर विद्यापीठ, व्हिबीएसपी विद्यापीठ, जौनपूर आणि बनारस हिंदू विद्यापीठ (पूर्व विभाग); पश्चिम विभागाकडून सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ, एलएनसीटी विद्यापीठ, भोपाळ; मुंबई विद्यापीठ, आणि पारुल विद्यापीठ, वडोदरा. पुण्यात होत असलेल्या ह्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला रु.25,000 चे रोख पारितोषिक डॉ. भोसले यांनी जाहीर केले.

जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धा (जेएनएचटी) सोसायटीचे महासचिव म्हणाले, ज्या शहरामध्ये अनेक दिग्गज हॉकीपटू तयार झाले त्या शहरात ही स्पर्धा होत आहे, हा आमचा बहुमान आहे. जेएनएचटी १९६४ पासून राष्ट्रीय व आंतररष्ट्रीयस्तरावर हॉकी खेळाचा प्रचार व प्रसार करीत आहे. यासाठी आम्ही राष्ट्रीय व आंतररष्ट्रीयस्तरावरील स्पर्धांचे सुध्दा आयोजन करीत आहोत. मी एसएनबीपीच्या अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले मॅडम त्यांचे आभार मानतो ज्या आमच्या सोसायटीच्या प्रथम महिला निवडल्या गेल्या आहेत. आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकीवरील प्रेम आणि या खेळाच्या प्रसार व प्रचार करण्यासाठी त्या सातत्याने करीत असलेले प्रयत्न यासाठी मी त्यांचे आभार मानतो.

डॉ. वृषाली भोसले म्हणाल्या, एसएनबीपीच्या माध्यमातून आम्ही हॉकी खेळाचा शालेयस्तरापसून जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करून विकासासाठी प्रयत्नशिल असतो. याचाच भाग म्हणून आम्ही पुढिल पाऊल टाकत विद्यापीठस्तरावरील हॉकी खेळा प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. मला विश्वास आहे की या स्पर्धेतून नक्कीच भारतीय संघासाठी उत्कृष्ट खेळाडू मिळतील आणि त्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा म्हणजे एक महत्वाचा टप्पा ठरेल.

Leave a Reply

%d bloggers like this: