महिलांच्या सहभागातून समृद्ध समाजाची निर्मीती – डॉ.अजय चंदनवाले

पुणे : कौटुंबिक जबाबदा-या सांभाळून महिला आज विविध क्षेत्रांमध्ये आपले नाव उंचावत आहेत. महिला केवळ स्वत:लाच नव्हे तर कुटुंबाचा आणिसमाजाचा ही उद्धार करण्यात अग्रेसर असतात. महिलांचा सहभाग वाढला तरच त्यातून समृद्ध समाजाची निर्मिती होऊ शकते, अशी भावना वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केली.

उडान फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविधक्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणा-या महिलांचा सन्मान डॉ. अजय चंदनवाले यांच्या हस्ते कोथरुड येथील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा व संस्थापिका सारिका शेळके, राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेविका वसंती जाधव, महिला व बाल कल्याण उपायुक्त वैशाली त्रिभुवन, कांचन कुंबरे, उडान फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा भाग्यश्री ठाकूर, अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, डिंपल पाडावे, डॉ. विनायक काळे, डॉ. अजय तावरे, डॉ. विजय जाधव आदी उपस्थित होते.

डॉ. वर्षा पोतदार, डॉ.डिंपल पाडवे, आरती गोखले, बागेश्री मंठाळकर, सोनाली साळवी, दया इंगळे, स्वाती वेदक, बिना हिरेकर, डॉ. मोनाली चोपडे, डॉ. विनिता लोंबर, अश्विनी रसाळ, श्वेता शेंडे, रुबी डिसूजा ,राजेश्री कानडे, राणी चव्हाण, डॉ. भारती राजगुरू , भावना ढोमसे आदी महिलांचा सन्मान करण्यात आला.

डॉ.अजय चंदनवाले म्हणाले, महाराष्ट्र भूमीतील जिजाऊ मासाहेब, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई यांच्या संस्काराने हा देश घडविण्यात मोठे योगदान दिले आहे. प्रत्येक स्त्री आपल्या घरातीलसर्व सदस्यांची काळजी घेत समाजासाठी काम करत असते. महिला कोणत्याही शेत्रात मागेनाहीत डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस, देशाचे रक्षणात सुद्धा त्यामागे नाहीत.

सिद्धेश्वर झाडबुके म्हणाले, जिजाऊंच्या शिकवणीतून ज्याप्रमाणे छत्रपती शिवराय घडले त्याच प्रमाणे प्रत्येक आई आपल्या मुलाला चांगले संस्कार देत असते. अशा प्रकारच्या संस्कारातूनच उद्याचे उज्वल भविष्य निर्माण होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. 

डान्स ओझोन च्या कलाकारांनी आपली कला सादर केली.शुभांगी गोळे व रवी ठगे यांनी कोरिओग्राफर म्हणून सहभाग घेतला. डान्स वर्सिटी याग्रुप ने डान्स वॉक सादर केला. कार्यक्रमाचे आयोजक उडान फाउंडेशनचे भाग्यश्री ठाकूर, चेतन ओसवाल, महिपती ठाकूर, शालिनी कुलकर्णी, शुभांगी गोळे, शंतनु कुलकर्णी यांनी केले.आरती पाठक यांनी सूत्रसंचालन केले. अनिरुद्ध हळंदे यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: