पोस्टर प्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे: सामान्य माणसापर्यंत हा इतिहास पोहोचला पाहिजे ही भूमिका घेऊन संयुक्त स्त्री संस्था आणि अभिव्यक्तीने घेतलेला पुढाकार निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. तो काळच वेगळा होता, सगळे झोकून देऊन स्वातंत्र्यलढ्यात काम करत होते. स्त्रियांनी आपले वेगळेपण धडाडी दाखवून दिली होती. त्या आठवणी खरंच एका ठेवा म्हणून आहेत. असे प्रदर्शनाच्या उद्घाटनाकर्त्या रोहिणी गवाणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रोहिणी गवाणकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अपर्ण करून आणि दीपप्रज्वलन करून झाले. उद्घाटनानंतर झालेल्या सभेला उद्देश्यून त्या बलत होत्या. स्वातंत्र्यलढ्याचा अमृत महोत्सव व आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अग्रणी असलेल्या व स्वातंत्र्यानंतर समाज घडवण्यामध्ये मोलाचा सहभाग असणाऱ्या विरांगनांच्या योगदानाची माहिती लोकांसमोर यावी, त्यांच्या कर्तुत्वाची ओळख व्हावी यासाठी पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन संयुक्त स्त्री संस्था आणि अभिव्यक्तीने केले आहे.

बाळासाहेब ठाकरे कलादालनात मंगळवार ८ मार्च सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत विनामुल्य असणारे हे प्रदर्शन सुरु आहे.

त्या पुढे म्हणाल्या की अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्यातील बेगम हजरत महल ही मुस्लिम स्त्री तिने व्हिक्टोरिया राणीने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याला सडेतोड उत्तर देऊन आपला करारी बाणा सिद्ध केला होता. तर तिकडे दक्षिणेत सुनंदा राव नावाची महिला तिच्या संस्थानातल्या जनतेला म्हणाली होती हे राज्य तुमच्या हवाली आहे, याचा कारभार कसा चालवायचा तुम्ही ठरवा. म्हणजे सर्वात प्रथम आपल्या संस्थानात लोकशाही आणणारी ही पहिली स्त्री. आणि अशा अनेक आठवणी आहेत, ज्या तरुण पिढीपर्यंत आणि शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत.

यावेळी विचारपीठावर ॲड. अभय छाजेड, अभिव्यक्तीच्या समन्वयक अलका जोशी, संयुक्त स्त्री संस्थेच्या अध्यक्षा नीता राजपूत आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक नीता राजपूत यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: