पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दोऱ्याच्या विरोधात काँग्रेसचे काळे कपडे घालून आंदोलन

पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दोऱ्यावर येत आहेत.पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने याला विरोध केला आहे. आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या पुणे दोऱ्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन पुण्यात अलका चौक येथे करण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस मुळे कोरोना पसरतो आणि शिवाजी महाराज यांच्या बदल केलेल्या विधानाचा निषेध करण्यात आला. हे आंदोलन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनाला माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार दीप्ती चौधरी, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या महिला अध्यक्षा पूजा आनंद,माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, संजय बालगुडे, रमेश अय्यर यांच्यासह पुणे शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रमेश बागवे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येत आहेत .पण आमचा त्यांच्या दौऱ्याला विरोध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकास कामाचे उद्घाटन करायला येत नाहीत.ते महानगरपालिका निवडणूक जवळ आली आहे.म्हणून शक्ती प्रदर्शन करायला येत आहेत.नदी सुधार प्रकल्प हे भाजपने
गेल्या 5 वर्षांत पुणेकरांना का दिले नाहीत. महानगरपालिका निवडणूक ही जसी जवळ येऊ लागली तसा या प्रकल्पाचे उद्घाटन ला केले का जात आहेत. नरेंद्र मोदी यांनी मागच्या महिन्यात काँग्रेसने कोरोना पसरवीला .हा राग डोक्यात ठेवून आज आम्ही नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी काळे कपडे घालून आंदोलन करत आहोत. असे रमेश बागवे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: