…अखेर मोदींच्या त्या शाही फेट्यावरील शिवमुद्रा काढली
पुणे :- पंतप्रधान नरेंद्रमोदी पुणे दौऱ्यावर येत असून शहरातील मेट्रो तसेच इतर विकास कामांचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. तसेच पुण्यातील एमआयटी कॉलेज येथील मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असताना त्यांच्या स्वागतासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पनेनुसार मुरुडकर फेटेवाले यांच्याकडून शाही फेटा बनविण्यात आला आहे या शाही फेट्यासाठी एक आठवडाभर मेहनत घेण्यात आली असल्याची माहिती मुरुडकर फेटेवालेचे मालक गिरीश मुरुडकर यांनी दिली.
मुरुडकर फेटेवाले यांच्याकडून आजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अनेक फेटे तयार करण्यात आले आहेत. आजवर झाला नाही असा ऐतिहासीक फेटा तयार करण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. आणि त्यानुसार आम्ही त्यावर काम सुरू केलं. आणि सुमारे आठ दिवस 5 ते 6 लोकांची टीम मिळून हा फेटा तयार केला आहे. हा राजबिंडा शाही फेटा असून यात शिवमुद्रा, रेशमीचा कापड, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रेसकोडला शोभेल असा फेटा बनविला होता. परंतु राजमुद्रे वरुन राजकारण होऊ लागल्याने या फेटयावरील राजमुद्रा काढून त्याठिकानी मोत्यांचे सूर्यफुल लावण्यात आले असं देखील यावेळी मुरुडकर यांनी सांगितलं.
