Friday, June 5, 2026
Latest NewsSports

रास करंडक- रत्नरूप इलेव्हन, न्याती इलेव्हन, एसजे काँट्रॅक्टस, सुरोज बिल्डकॉन संघांची विजयी सलामी !!

पुणे,  रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस तर्फे आयोजित ‘रास करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत रत्नरूप इलेव्हन, न्याती इलेव्हन, एसजे काँट्रॅक्टस आणि सुरोज बिल्डकॉन या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला.

पुनावळे येथील स्पार्क क्रिकेट अ‍ॅकॅडमी येथे झालेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी नितेश बिनावत ३८ धावांच्या जोरावर न्याती इलेव्हन संघाने सुर्या ग्रुप इलेव्हन संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला. दुसर्‍या सामन्यात आनंद राजवर या भेदक गोलंदाजीमुळे एसजे काँट्रॅक्टस संघाने सुरोज बिल्डकॉन संघाचा ३२ धावांनी सहज पराभव केला. आनंद याने ९ धावात ६ गडी बाद करून भेदक गोलंदाजी केली.

प्रकाश गायकवाड याच्या अचूक गोलंदाजीमुळे रत्नरूप इलेव्हन संघाने मिलेनीयम इंजीनिअर्स संघाचा ९ गडी राखून सहज पराभव केला. प्रकाश गायकवाड याने ७ धावात ४ गडी टिपून भेदक गोलंदाजी केली. रजनिकांत पडवळ याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर सुरोज बिल्डकॉन संघाने न्याती इलेव्हन संघाचा ३१ धावांनी पराभव करून उद्घाटनाचा दिवस गाजवला.

स्पर्धेचे उद्घाटन मिलेनिअम ग्रुपचे अध्यक्ष एम.बी. नांबियार, एस.जे. ग्रुपचे अध्यक्ष सुहास जंगले यांच्या हस्ते झाले. यावेळी रास प्रोजेक्ट कन्सल्टंटस्चे व्यवस्थापकीय संचालक अनिल हिंगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

स्पर्धेचा सविस्तर निकालः
१) सुर्या ग्रुप इलेव्हनः १० षटकात १० गडी बाद ८० धावा (राजेश पवार ३५, ऋषिकेश पाटील १८, दिनेश मिसाळ २-१४, सचिन तांब्रे २-२१) पराभूत वि. न्याती इलेव्हनः ९.४ षटकात २ गडी बाद ८४ धावा (नितेश बिनावत ३८, बलबीर सिंग नाबाद ३७); सामनावीरः नितेश बिनावत;

२) एसजे काँट्रॅक्टसः १० षटकात ९ गडी बाद ८२ धावा (आनंद राजवर २१, श्रीकांत पवार १९, अमृत निकम १३, नरसिंग २-३२) वि.वि. सुरोज बिल्डकॉनः ८.५ षटकात १० गडी बाद ५० धावा (राजनिकांत पडवळ ११, ओंकार जाधव १४, आनंद राजवत ६-९, कपिल अंबोर १-२); सामनावीरः आनंद राजवर;

३) मिलेनीयम इंजीनिअर्सः १० षटकात ७ गडी बाद ६८ (सुरज राजु २६, योगेश जाधव १८, प्रकाश गायकवाड ४-७, यासिन शेख ३-२४) पराभूत वि. रत्नरूप इलेव्हनः ६.४ षटकात १ गडी बाद ६९ धावा (मंगेश पवार २६, राहूल जी. १८, सागर भागवत नाबाद २२, राहूल बाबर १-८); सामनावीरः प्रकाश गायकवाड;

४) सुरोज बिल्डकॉनः ८ षटकात ६ गडी बाद ७९ धावा (ताराबापु ३३, विवेक चौधरी १६, सचिन तांब्रे ४-१६, रजनिकांत पडवळ १२) वि.वि. न्याती इलेव्हनः ८ षटकात ९ गडी बाद ४८ धावा (पराग ढोले १९, रजनिकांत पडवळ ३-३, विकास मते ३-१५); सामनावीरः रजनिकांत पडवळ;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading