आकाश+बायजूचे मंचर येथे पहिले क्लासरूम सेंटर
मंचर, पुणे: हजारो विद्यार्थ्यांना त्यांची डॉक्टर किंवा आयआयटीयन्स होण्याची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यामध्ये मदत करण्यासाठी आपले नेटवर्क देशाच्या विविध भागांमध्ये विस्तारण्याचे उद्दिष्ट आणखी पुढे नेत, परीक्षा तयारी सेवा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील आघाडीची कंपनी आकाश+बायजू ने आज महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मंचर येथे आपल्या पहिल्या क्लासरूम सेंटरचे उद्घाटन केले. या नवीन केंद्रात 6 क्लासरूम्स असतील आणि त्यात 360 विद्यार्थी सामावले जातील.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर गावातील मंचर पिंपळगाव मार्गावरील ग्रीन स्क्वेअर व्यावसायिक संकुलात सुरू करण्यात आलेले हे क्लासरूम सेंटर मेडिकल व इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षांची (एण्ट्रन्स एग्झाम) तसेच फाउंडेशन स्तरावरील अभ्यासक्रमांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सेवा देईल. हे केंद्र त्यांना ऑलिम्पियाडसारख्या विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करण्यात मदत करेल. याशिवाय त्यांचा पाया पक्का करून घेण्यातही मदत करेल.
आकाश+बायजू चे प्रादेशिक संचालक (रिजनल डायरेक्टर) अमित राठोड यांच्या हस्ते क्लासरूम सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ उपसंचालक विनय पांडे आणि कंपनीचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
आकाश+बायजू चे व्यवस्थापकीय संचालक आकाश चौधरी, नवीन केंद्राच्या उद्घाटनाबद्दल, म्हणाले: “पुणे जिल्ह्यातील मंचर येथे सुरू होत असलेले हे पहिले क्लासरूम सेटंर ऑलिम्पियाड्स उत्तीर्ण करू इच्छिणाऱ्या तसेच डॉक्टर व आयआयटीयन्स होण्यासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठे वरदान ठरणार आहे. आपल्या भारतभरातील केंद्रांच्या जाळ्यामार्फत दर्जेदार शिक्षण पुरवण्यासाठी आज आकाश+बायजू सर्वत्र ओळखले जाते. आमच्या शैक्षणिक काँटेण्टचा दर्जा तसेच आमच्या अध्यापन पद्धतींची परिणामकारकता, आमच्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येतून, स्पष्ट दिसून येते. यामुळेच वैद्यकीय व इंजिनीअरिंग पदवी अभ्यासक्रमांसाठी पात्र ठरू इच्छिणारे विद्यार्थी आकाश+बायजू ला पहिली पसंती देत आहेत.”
चौधरी म्हणाले, “पुण्याजवळील मंचर येथे आमचे पहिले क्लासरूम सेंटर उघडून महाराष्ट्रातील आमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्या राष्ट्रीय नेटवर्कमध्ये या शाखेची भर पडली आहे आणि त्यातून मानकीकृत दर्जेदार अध्यापन, आधुनिक संरचना आणि भारतभरातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित प्रणालींच्या माध्यमातून अनुकूल अध्ययन वातावरण देण्याप्रती आमची बांधिलकी स्पष्ट होते.” जे विद्यार्थी आकाश+बायजू मध्ये प्रवेश घेऊ इच्छितात, ते एक तर तत्काळ अॅडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट (iACST) देऊ शकतात किंवा ANTHEसाठी (आकाश नॅशनल टॅलंट हंट एग्झाम) नोंदणी करू शकतात.
