Friday, June 5, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आम्ही एक राजीनामा दिला आता नवाब मलिक राजीनामा देणार नाहीत – जयंत पाटील

पुणे : ED ने नवाब मलिक याच्या वर कारवाई केली. त्यामुळे भाजपचे नेते नवाब मालिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आहे. त्यावर रोज उठून चौकशी केली की राजीनामा घेऊ असं होत नाही. अनिल देशमुखांबाबत जे घडलं नाही. ते दाखवायचं प्रयत्न आता केला जात आहे. त्यामुळे आम्ही एक राजीनामा दिला आता नवाब मलिक राजीनामा देणार नाहीत, असे स्पष्ट वक्तव्य जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी पुण्यात केले.

युक्रेनमध्ये अनेक पुण्यातील मुले अडकली आहेत. त्यावर जयंत पाटील म्हणाले, अनेक पालक अन मुलाशी बोलणं सुरू आहे. दुर्दैवाने एकाच मृत्यू झाला. केंद्र सरकारने उशिर केला. केंद्र सरकारने जास्त लक्ष दिलं पाहिजे.तिथल्या नागरिकांच समाधान झालं नाही. याचा अर्थ आपण कमी पडतो
आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

राज्यपाल भगतसिंग कोठारी यांनी दोन दिवसांपूर्वी शिवाजी महाराजांच्या बद्दल औरंगाबाद मध्ये चुकीचे विधान केले. त्यामुळे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मोठे आंदोलन केले होते. त्यावर जयंत पाटील म्हणाले,महाराष्ट्राचा इतिहास सर्वाना माहिती आहे. औरंगाबाद कोर्टाने देखील निर्णय दिलाय . त्यामुळे अशा गोष्ठी टाळायला हवेत ते महाराष्ट्राचे हेड आहेत. त्यामुळे आस बोलणं योग्य नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सहा तारखेला पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यावर पाटील म्हणाले, मोदी दौरा मेट्रो उदघाटन करायला येत आहेत. ते प्रचार करायला येत नाही. भाजप ने विकास काम उदघाटन  करायला येत आहेत. त्यांना वेळ आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसची परी संवाद यात्रा चालू होत आहे. त्यावर जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी परिसंवाद यात्रेला चांगला प्रतिसाद आहे. अनेक लोकांशी संवाद होतोय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading