Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपने उत्तर देणे संयुक्तिक ठरेल – खासदार सुनील तटकरे 

पुणे : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी “समर्थ रामदास स्वामी यांच्या शिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल” असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्या त्याविरोधात पुणे महानगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलन केले. त्याच पालिकेत आज एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे नेते व खासदार सुनील तटकरे हे महानगरपालिकेत आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सुनील तटकरे म्हणाले, शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेध आम्ही करतो. शिवप्रेमी हे कदापि सहन करणार नाही. भाजपने यावर उत्तर देणे संयुक्तिक ठरेल, असे खासदार सुनील तटकरे म्हणाले.

पुढे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, राज्यापालांनी केलेले हे विधान चुकीचे आहे. महाराष्ट्राचे शिवप्रेमी हे कदापिही सहन करणार नाही. महाराष्ट्राबद्दल व शिवाजी महाराज याच्याबद्दल काही मोठे लोक वारंवार चुकीची विधाने करीत आहे. हे वारंवार घडतंय हे मोठे दुर्दैव आहे, असेही सुनील तटकरे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading