Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

भारत सासणे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पुणे : साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिक व उदगीरमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांना सन्मानित करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार रविवारी प्रदान करण्यात आला.
पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या ज्येष्ठ साहित्यिकास प्रदान करण्यात येतो. मराठी राजभाषा दिनानिमित्त मुबंईत आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात सासणे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमात दृकश्राव्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. कार्यक्रमास मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, मंत्री विश्वजित कदम, खासदार अरविंद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीस दृकश्राव्य चित्रफितीद्वारे भारत सासणे यांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading