राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक
पुणे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्या त्याविरोधात पुणे महानगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलन केले.त्यांनतर शिवसेनेने पण आंदोलन केले. लगेचच काँग्रेसने पण आंदोलन केले.
हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, छत्रपती श्री शिवाजी महाराज प्रिप्रेटरी मिलिटरी स्कूल, पुणे मनपा जवळ आंदोलन केले.
या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले .
या आंदोलनाला काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे, माजी महापौर दीप्ती चौधरी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षा, मनीष आनंद, महिला उपाध्यक्ष संगीता तिवारी, संगीता धोंडे, निता त्रिवेदी , रुपाली कापसे, डॉ अंजली ठाकरे, जयश्री वानखेडे, सूर्यशिला मोरे, काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमेश बागवे म्हणाले, या राज्यपालांने आमच्या शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे .याचा आम्ही निषेध करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण शिवाजी महाराजांचा अपमान केला होता.
या महाराष्ट्रात फक्त मराठी माणस आहेत बाहेरचे माणसे येऊन शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत .महा विकास आघाडी सरकार हे कदापि सहन करणार नाही. येणाऱ्या पुढील काळात जर राज्यपालांनी माफी मागितली नाही. तर आम्ही तीव्र आंदोलन करू .असा इशारा रमेश बागवे यांनी दिला.