fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागावी शिवसेनेची मागणी

पुणे : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केलं. त्या त्याविरोधात पुणे महानगर पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आंदोलन केले.त्यांनतर शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, छत्रपती श्री शिवाजी महाराज प्रिप्रेटरी मिलिटरी स्कूल, पुणे मनपा जवळ आंदोलन केले.

या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी केले होते.
या आंदोलनाला गजानन थरकुडे, नगसेवक विशाल धनवडे, पुणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय मोरे म्हणाले, की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन, केंद्रात भाजपाची सत्ता आली आहे. पण सतत भाजपाच्या नेत्यांकडून वादग्रस्त विधानं केली जात आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल विधान केले आहे. त्या विधानाचा आम्ही निषेध करतो. तसेच, येत्या ६ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमास येणार आहेत. त्यावेळी त्यांच्याबरोबर राज्यपाल कोश्यारी हे देखील असणार आहेत. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमा अगोदरच छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी, अन्यथा आम्ही त्यांना चांगलाच धडा शिकवू. असे संजय मोरे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading