Friday, June 5, 2026
Latest NewsPUNE

पुण्यामध्ये दोन महानगरपालिका व्हायला पाहिजे – चंद्रकांत पाटील

पुणे : पुणे महापालिकेत नव्याने 34 गावे समाविष्ट झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेचे लोकसंख्या तब्बल 70 लाखांवर गेली आहे. अस असताना प्रगती कशी होणार? असा सवाल करत पुण्यामध्ये दोन महानगरपालिका व्हायला पाहिजे अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

काल शेवाळेवाडी येथे आयोजित सभेला चंद्रकांत पाटील यांनी संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या पाच वर्षात पुणे महानगरपालिकेमध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाहीये किंवा तो सिद्धही झालेला नाही. त्यामुळे आगामी काळातही पुणे महानगरपालिकेत भाजपचीच सत्ता येणार असून तुम्ही आम्हाला साथ द्या असं आवाहन त्यांनी केले. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे गावाचं गावपण नष्ट होतं आणि शहरात आलेला नागरिकांचा विकासही होत नाही. मात्र अजित पवारांना वाटत आपली महापालिका मोठी व्हावी. कारण नंतर गावातील जमिनी हडप करयला मिळतात, अशी टीका ही त्यांनी अजित पवारांवर केलीय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading