fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे शहरात आज 24 तासात कोरोनाचे 176 नवीन रुग्ण

पुणे : पुणे शहरामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात 176 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 223रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे शहरात आजपर्यंत संख्या 66 लाख 3 हजार 67 इतकी झाली आहे. यापैकी 64 लाख 97 हजार 90 रुग्ण बरे झाले आहेत.

पुण्यात गेल्या 24 तासात एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत पुणे शहरात 9345 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुणे शहरामध्ये सध्या 1 हजार 232 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 63 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 2611 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading