मराठी राजभाषा दिना निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मराठी स्वाक्षरी मोहीमेस सुरुवात
हडपसर : आज २७ फेब्रुवारी म्हणजेच मराठी राजभाषा दिन, हा दिवस मराठी अस्मिता अभिमानाने मिरवण्याचा, हा दिवस मराठी जगण्याचा हा दिवस मराठी गाजवण्याचा. पण आज याच भव्य दिव्य आणि प्राचीन मराठीला केंद्र सरकारकडून अभिजात दर्जा प्राप्त होत नाहीये. म्हणूनच हडपसर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमदार चेतन तुपे यांच्या अध्यक्षतेखाली कुमार उर्फ गौरव तुपे यांनी स्वाक्षरी मोहीम राबावण्यात आली.
चेतन तुपे म्हणाले, मराठी भाषेचा इतिहास हा अतिशय प्राचीन आहे. भारतामध्ये ही संख्या दुसऱ्या क्रमांकाची आहे. जवळपास तेरा कोटी महाराष्ट्राची संख्या झालेली आहे. आणि तेरा कोटी जनता मराठी बोलते त्यामुळे जगातील दहाव्या क्रमांकाची बोलणारी भाषा ही मराठी आहे. भारतामध्ये काही भाषांना अभिजात दर्जा दिला गेलेला आहे. परंतु अजूनही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाही.
यासाठी एक लढाई सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार यांच्या मध्ये अग्रेसर आहे. सातत्याने प्रयत्नशील आहे. मराठी भाषा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी सर्व खासदारांना विनंती पत्र लिहिलेली आहेत. याचा मी संसदेत सुद्धा आवाज उठविलेला आहे. मला निश्चितच खात्री आहे.मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्याच्या दृष्टीने पाऊल उचलली जातील.आज आमचे सहकारी कुमार तुपे यांनी एक रथ तयार करून त्याच्यावर स्वाक्षरी मोहीम हा अभिनव उपक्रम केला आहे.त्यांच्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो.निश्चित या उपक्रमामुळे मराठीचा डंका जगभरात पुन्हा एकदा निनादेल असा विश्वास व्यक्त करतो.
कुमार तुपे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा म्हणून ही स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत ही मोहीम तीन दिवस असणार आहे. या स्वाक्षऱ्या आम्ही राज्य सरकार मार्फत केंद्र सरकार ला पाठवणार. मराठी भाषेला अभिजात दर्जा लवकरच प्राप्त झाला पाहिजे.माझ्या हडपसर मधील तरुणांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 24 येथील सर्व सहकाऱ्यांनी ही संकल्पना केली आहे.
ह्या मोहिमेचा शुभारंभ आमदार चेतन तुपे यांच्या निवास्थानापासून झाला. या कार्यक्रमांस मराठी भाषा समिती अध्यक्ष, कुमार उर्फ गौरव तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हडपसर विधानसभा अध्यक्ष शंतनू जगदाळे, सोनल चेतन तुपे, गणेश घुले, अतुल ताटे, तेजस सातव, विश्वजित तुपे, माऊली शिंदे, राष्ट्रवादी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
