Friday, June 5, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

बालभारतीच्या वरती काही न वाचलेले देखील विधानभवनात निवडून जातात – राज ठाकरे

पुणे : बालभारतीच्या पुस्तकाच्या वरती काहीही न वाचलेली लोकं विधान भावनात निवडून जातात अशी मिश्किल टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना केली.

पुण्यातील एस एम जोशी सभागृहात झालेल्या ‘पुण्यभूषण’या दिवाळी अंकाच्या पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी राज ठाकरे बोलत होते.

यावेळी बोलताना ‘एअरटेल’ सारख्या काही मोबाईल कंपन्या मराठी भाषेला नकार देत होत्या.  त्यावेळी त्यांच्या एअरची टेल मनसेने खेचली आणि त्यामुळे आता मोबाईलमध्ये मराठी भाषा दिसायला लागली, असेही राज ठाकरे म्हणाले

मागील काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्यासाठी बंगला गेलो असता बंगालचा मंत्रालयाची बिल्डिंग म्हाडाच्या बिल्डिंगसारखी दिसत होती.  जेव्हा मी मंत्रालयाच्या लिफ्ट मध्ये प्रवेश केला तेव्हा त्या लिफ्ट मध्ये किशोर कुमार यांची बंगाली गाणी लागली असंच प्रेम आपण आपल्या भाषेवर केलं तर आपली भाषा समृद्ध होईल असे देखील राज ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading