Friday, June 5, 2026
ENTERTAINMENTLatest News

इंडियन आयडल मराठीच्या मंचावर येणार ‘झुंड’ चित्रपटाची टीम

पुणे : सोनी मराठी वाहिनीवरील इंडियन आयडल मराठी हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. विजेतेपदासाठी स्पर्धाकांमध्ये सुरांची टक्कर पाहायला मिळत आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांचे मत यांच्याआधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरु झाली आहे. अजय अतुल हे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्यामुळे स्पर्धकांचा जोश वाढत आहे. दर आठवड्याला या स्पर्धकांचे मनोबल वाढवण्यासाठी वेगवेगळे पाहुणे कलाकार हे मंचावर येतात.

या आठवड्यात ‘झुंड’ या आगामी चित्रपटाचे कलाकार इंडियन आयडल च्या मंचावर येऊन स्पर्धकांना शुभेच्छा देणार आहेत. नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटातील मुख्य कलाकार मंडळींपैकी आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे कलाकार त्यांच्या चित्रपटाविषयी माहिती सांगायला आणि स्पर्धकांचा सुरेल आवाज ऐकायला तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येणार आहेत . सैराट फेम ‘आर्ची’ आणि ‘परश्या’ यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले असून सर्वदूर पर्यंत ह्यांचे चाहते पाहायला मिळतात. आता या चाहत्यांसाठी हि जोडी आणि नागराज मंजुळे यांची निर्मिती हा संगम पुन्हा एकदा ‘झुंड’ या चित्रपताच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading