Sunday, November 1, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

महानगरपालिका निवडणुकीत आम्ही जास्तीत जास्त जागा जिंकू – रामदास आठवले

पुणे: आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या बरोबर रिपब्लिकन पक्ष परत निवडणूक लढवणार आहे का हे अजून ठरले नाही .आम्ही येणाऱ्या महापालिका निवडणुकीत 20 जागा भारतीय जनता पार्टी कडे मागणार आहोत आणि निवडणूकित जास्तीत जास्त जागा आम्ही जिंकू असं पुण्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले हे आज पुणे दौऱ्यावर होते.ते यावेळी बोलत होते.

रामदास आठवले यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राज्यात जे सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहे त्यावर आठवले म्हणाले की  जी भाषा सध्या बोलली जात आहे ती बोलू नये.एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्याचा अधिकार सर्वांना आहे.पण आरोप प्रत्यारोप करत असताना भाषेबाबत तारतम्य वापरायला हवं.छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकाळात मॅनेजमेंट होत सध्या मॅनेज चाललं आहे. हा वाद मिटला पाहिजे.मुख्यमंत्री यांनी हा वाद मिटवण्यासाठी पुढे यायला हवं.पून्हा एकदा भाजप आणि शिवसेनेची दोस्ती होणं गरजेचं आहे.आत्ता दोस्त दोस्त ना राहा दुश्मन दोस्त झाला आहे. असे रामदास आठवले म्हणाले.

तिसरी आघाडी होणार की नाही हा प्रश्न अजुन जनतेला सतवत आहे. त्यावर रामदास आठवले म्हणाले, तिसरी आघाडी झाली तरी आम्हाला काहीही फरक पडणार नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एवढं काम केलं आहे की 2024 मध्ये पुन्हा एकदा एनडीएचा झेंडा संसदेत फडकणार.असं यावेळी आठवले म्हणाले.

Leave a Reply