Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

रश्मी ठाकरे यांच्या ऐवजी ‘या’ व्यक्तीला सामनाच्या संपादक पदी ठेवा; बघू भाषा बदलते का?- चंद्रकांत पाटील

पुणे : सध्या सामना पेपरमध्ये किरीट सोमय्या व भाजपच्या नेत्या बद्दल वेगवेगळ्या भाषेतून टीका होत आहे. त्यावर रश्मी वहिनी सामनाच्या संपादक आहेत. त्यांना बदला आणि अनिल परबांना संपादक करा. सामनामध्ये कशी भाषा बदलत जाते ते आपण बघूच, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या संजय राऊत यांच्यावर टीका केली.

पुण्यातील पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात सध्या जे काही चाललय त्याबाबत ‘अँक्शनला रिएक्शन होतच राहणार’ असे म्हणावे लागेल. सगळ्यांना कोणीतरी अधिकारवाणीने सांगू शकेल, अशी अराजकीय व्यक्ती राहिलेली नाहीये. अशावेळी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे.  मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना बोलवावं. पण ते कसे बोलवणार?

राणे संजय राऊत यांच्यावर रोज नवीन ट्विट करत आहेत. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले ,राणेंच्या ट्विट बाबत मला माहिती नाही. परंतु ते केंद्रीय मंत्री आहेत. माहितीच्या आधारेच ते बोलतात.
सध्या राज्यात नगरसेवकांची फोडाफोडी सुरू आहे. महाविकास आघाडीचे जे सर्वेसर्वा आहेत ते काँग्रेस आणि शिवसेनेला कटपुतली सारखे नाचवताहेत, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading