Wednesday, June 24, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे शहरात गेल्या 24 तासात कोरोनाचे नवीन 318 रुग्ण

पुणे :  पुणे शहरामध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्या कमी होत आहे. आज दिवसभरात पुणे शहरात
318 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 700 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत संख्या 6 लाख 58 हजार 444 इतकी झाली आहे. यापैकी 6 लाख 46 हजार 644 रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 2 तर हद्दीबाहेरील 1 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 334 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.पुणे शहरामध्ये सध्या 2 हजार 646 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 136 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 3910 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली  आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading