Tuesday, June 23, 2026
Latest NewsPUNE

संविधान जनजागृती परिषद संपन्न

पुणे:उरळी कांचन येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित भारतीय संविधान संघ पुणे यांच्यावतीने संविधान जनजागृती परिषद कार्यक्रम संपन्न झाला.

संविधान जनजागृती परिषद कार्यक्रमासाठी शिक्षणसम्राट महादेवराव कांचन, समाज सेवक संतोष कांचन, उद्योजक सागर कांचन, समाज सेविका सविता कांचन, प्रा. भाऊसाहेब शिंदे, आदर्श शिक्षक प्रा. बाळकृष्ण काकडे, संविधान प्रचारक भीमराव धिवार, बाळासाहेब बडेकर, नितिनभाऊ जगताप, विनोदभाऊ बेंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांना संविधान प्रत, संविधान डायरी, एक झाड देऊन सन्मान केला तसेच पुणे इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक  हुलगेश चलवादी यांनी संदेश आंबेडकर यांना महात्मा फुले यांची समतेची पगडी देऊन  सत्कार केला.

विष्णू भोसले बोलताना म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे आहेत. शिवरायांचा खरा इतिहास बहुजन समाजाला सांगणे गरजेचे आहे. सामाजिक प्रबोधन करुन जनतेने सत्य इतिहासाचा बोध घेतला पाहिजे. संविधान जनजागृती परिषदेत सर्वांनी संविधानाचा अभ्यास करावा असे सांगितले.”
संदेश आंबेडकर म्हणाले की, “भारतीय संविधान संघाने शिवरायांच्या जयंतीनिमित्त संविधान जनजागृती परिषद आयोजित केली हे ऐतिहासिक आहे. माझे पणजोबा बाबासाहेब आंबेडकर उरुळी कांचन येथे ७० वर्षांपूर्वी आलेले होते.
भारतीय संविधानाचा प्रचार-प्रसार करणे काळाची गरज आहे. आपण सारे भारतीय म्हणून एकत्र आले पाहिजे. संविधानाची अंमलबजावणी आणि संरक्षण करणे भारतीय म्हणून प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य आहे.
*मतदान हे दान नसून आपला मताधिकार आहे. मत हे बहुमोल आहे आणि मताची किंमत होऊच शकत नाही. प्रामाणिक, निष्ठावंत व अभ्यासू प्रतिनिधी निवडून पाठवा तरच आपला उद्धार होईल.
संविधान जनजागृती परिषद यशस्वी करण्यासाठी संदीप बडेकर, निलेश शेलार, केतन निकाळजे, सुभाष गायकवाड, निखिल पवार, गणेश कांबळे, सचिन भालशंकर, रोहित शिंदे, शोएब मनियार, अनिल साळवे, संतोष कांबळे, चंद्रकांत खलसे, अक्षय शिंदे, माऊली जाधव, सदाशिव कांबळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading