Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

हिजाबला बंदी घातल्याच्या निषेधार्थ मुस्लिम तरुणींचे पुण्यात आंदोलन

पुणे : कर्नाटक येथील हिजाब प्रकरणानंतर राज्यातील विविध शहरात मोठ्या प्रमाणात हिजबच्या समर्थनार्थ आंदोलने करण्यात आली. आज पुण्यातील आझम कॅम्पस येथे कुल जमाती तंजीमच्या वतीने महिलांची महासभा आयोजित करण्यात आली. यात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेत हिजाबच्या समर्थनार्थ जमले होते.

हिजाब हा मुस्लिम महिलांचा हक्क आहे आणि तो हिरावून घेतला जाऊ शकत नाही. आम्ही काय पेहेराव करायचा? हा आमचा अधिकार आहे. हिजाब हा आमचा अधिकार असून या अधिकारासाठी आम्ही अश्याच पद्धतीने लढा देत राहू, असा सूर यावेळी निघाला.

या आंदोलनाचे नेतृत्व सोशल ऍक्टिव्हिटी चे अध्यक्षा सुषमा अंधारे यांनी केले. या आंदोलनाला मोठ्या संख्येने मुस्लिम मुली व महिला उपस्थित होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, कर्नाटक येथील झालेला प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही आज आंदोलन करत आहे इथे प्रत्येक उपस्थित असल्यामुळे मुलीची हीच भावना आहे. आम्ही प्रत्येक मुस्लिम मुलीला आम्ही न्याय मिळवून देणार आहोत. असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading